राजकारणनगरचा कचरा निलेश लंकेंमार्फत गेला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ; पंतप्रधान कार्यालयानं...

नगरचा कचरा निलेश लंकेंमार्फत गेला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ; पंतप्रधान कार्यालयानं घेतली दखल…!

spot_img

सध्याची निवडणूक लोकसभेची असली तरी महापालिकेच्या गलथान कारभाराचा मुद्दा या निवडणूक प्रचारात उपस्थित करण्यात आल्याबद्दल सर्वच आश्चर्य व्यक्त होत आहे. या मागचं कारणदेखील मोठं रंजक आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे निलेश लंके निवडणूक लढवित आहेत. नगर शहरात मतदारांची सवांद साधत असताना लंके यांना नगरसेवक अस्वच्छता चांगलीच खटकली.

या संदर्भात निलेश लंके यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार केली. विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने देखील या तक्रारीची दखल घेतली आहे. निलेश लंके यांनी नगरची अस्वच्छता आणि दुर्गंधीसंदर्भात केंद्र सरकारच्या department of administrative reforms and public grivences च्या नोडल एजन्सीकडे तक्रार नोंदवली.

या तक्रारीत निलेश लंकेने म्हटले आहे की नगर शहरातल्या स्वच्छता आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत महापालिका आयुक्तांना अनेक वेळा कळवले मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की नगर महापालिका प्रशासनावर या संदर्भात कारवाई. दरम्यान निलेश लंके यांच्या या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या उपसचिव रोशनी दिनेश कदम पाटील यांना याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेशित केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...