नगर अर्बन बँकेत कुठल्याही पदावर नसलेले देवेंद्र दिलीप गांधी आणि प्रगती देवेंद्र गांधी हे अटकपूर्व जामीन कसे काय मागत आहेत, ते आरोपी आहेत, याचा साक्षात्कार त्यांना कसा काय झाला, त्यांनी काहीतरी गडबड केलेली असणार हे त्यांना स्वतः ला माहीत आहे. म्हणून ते अटकपूर्व मागत आहेत का, असे अनेक प्रश्न अर्बन बँक बचाव समितीचे संस्थापक आणि माजी संचालक राजेंद्र गांधी मोबाईल नंबर (9423793321) यांनी सोशल मिडियावर व्हायरल केलेला एका पोस्टद्वारे उपस्थित केले आहेत.
या पोस्टमध्ये राजेंद्र गांधी म्हणतात, की 2021 नंतर निवडून आलेल्या नवीन संचालकांपैकी एकटे कमलेश गांधी हेच अटकपूर्व जामिनाला कसे काय येतात ? बाकीचे संचालक तर बिनधास्त फिरत आहेत. हे नेमके काय गौडबंगाल आहे?
चिंचवड शाखेच्या 22 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणासाठी वेगळा गुन्हा दाखल आहे.
त्या घोटाळ्याशी संबंधित असलेला यद्नेस चव्हाण अहमदनगरच्या गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन कशासाठी मागत आहे? म्हणजे त्याचा सहभाग या गुन्ह्यात पण आहे का?
या यद्नेस चव्हाणवर चिंचवडला गुन्हा दाखल करणारे बँकेचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी एम. पी. साळवे येथे मात्र यद्नेस चव्हाणच्या हातात हात घालून अटकपूर्व जामीन मागत आहेत. खूप बनवाबनवी सुरु आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, की या सर्वांना पोलीस खात्यातलं कोणीतरी प्रचंड मदत करत आहे. हे सर्व जन मिळून बँकेचे सभासद, ठेवीदार यांना एप्रिल फूल करत आहेत. त्यामुळेच उद्या (दि 1 एप्रिल) ला हे सारे एकत्रित अटकपूर्व जामीन मागत आहेत.