युवा विश्व... हा तर खासदार डॉ. सुजय विखेंचा पोरकटपणा : माजी आमदार निलेश...

… हा तर खासदार डॉ. सुजय विखेंचा पोरकटपणा : माजी आमदार निलेश लंकेंचा पलटवार…!

spot_img

मी एक महिन्याची मुदत देतो, माझ्यासारखं भाषण पाठ करुन अगदी जसच्या तसं माझ्या सर्वच्या सर्व वाक्यांसह ते भाषण प्रतिस्पर्धी उमेदवारानं जनतेसमोर करुन दाखवावं, असं आव्हान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांनी माजी आमदार निलेश लंके यांचा नामोल्लेख टाळून केलं होतं. खासदार डॉक्टर विखे यांच्या या आव्हानाला माजी आमदार निलेश लंके यांनी आज (दि. 3) पलटवार दिलाय.

शेवगाव तालुक्यात जनसंवाद यात्रेच्या दरम्यान स्थानिक पत्रकारांनी माजी आमदार लंके यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘वास्तविक पाहता माझ्यासारख्या नं यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. पण हा त्यांचा निव्वळ पोरकटपणा आहे. त्यांचं हे वक्तव्य अशोभनीय आहे. कशाला महत्त्व द्यायचं, हे त्यांना समजत नाही, असं दिसत आहे. भाषण करुन एक वेळ लोकांवर तुम्ही प्रभाव टाकू शकता. मात्र लोकांची काम होणं आणि त्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा लोकांचे प्रश्न तुम्ही किती प्रभावीपणे मांडू शकता, हे महत्त्वाचं असतं.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा मसुदा तयार करत असताना सर्व मातृभाषांना समान दर्जा दिलेला आहे. प्रत्येकानं आपापल्या भाषेत जनतेचे प्रश्न मांडणं आवश्यक आहे. इंग्रजीतून बोललं महत्त्वाचं आहे की लोकांचे प्रश्न मांडून ते प्रश्न सोडून त्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देणं हे महत्त्वाचं आहे, हे आधी त्यांनी लक्षात घ्यावं’.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य सरचिटणीस प्रताप ढाकणे यावेळी उपस्थित होते. ‘हा माझा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत लंके यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार या मतदारसंघातल्या मतदारांनीच केला आहे. खरं तर जनतेनंच ही निवडणूक हाती घेतली आहे’, असं ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...