राजकारणस्टेट बँक चौक, शहापूर ते मेहेकरी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सामाजिक कार्यकर्ते...

स्टेट बँक चौक, शहापूर ते मेहेकरी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांनी गावकऱ्यांसह केले बंद.     

spot_img
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरालगत असणाऱ्या स्टेट बँक चौक, शहापूर मेहेकरी रस्त्यावरील खड्ड्यात पडून आतापर्यंत अनेक बळी गेलेले आहेत. लोकांचे जीव घेणारे हे खड्डे बुजून रस्ता दुरुस्ती करावी या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक वेळा राष्ट्रीय महामार्गाच्या उपभियंतांच्या दालनात आंदोलने केलेली आहे.
या आंदोलनाची दखल घेत या रस्त्याच्या कामासाठी ६० लाख रुपये एवढा निधी स्टेट बँक चौक शहापूर ते मेहेकरी दरम्यानच्या खड्ड्यासाठी मंजूर झालेले आहे. या खड्डे बुजवण्याच्या कामाला २ दिवसांपासून सुरुवात करण्यात आली. मात्र शहापूर येथील पेट्रोल पंपा समोर खड्डे बुजवीत असताना खडीमध्ये मातीचे मोठे प्रमाण असून डांबर चिटकत नव्हते.
त्यामुळे सदर कामाची पाहणी ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह कृष्णा बेरड, रामदास लगड, राम बेरड, ज्ञानदेव काळे, भानुदास नाटक, अरुण नाटक आदीसह गावकऱ्यांनी केली असता. एक दिवसापूर्वी बुजवलेले खड्डे हाताने व खोऱ्याने सहज उकरले जात होते. त्यामुळे हे निकृष्ट दर्जेचे काम तातडीने बंद करण्यात आले व अधिकाऱ्यांना बोलवून अधिकाऱ्यांनी देखील निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विद्यार्थी मित्रांनो! तयार आहात ना? कारण उद्या लागणार आहे 12 वीचा निकाल …!

राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष लागून होतं. अखेर राज्याच्या शिक्षण मंडळानं बारावीच्या निकालाची...

सोनं – चांदी खरेदी करतोस का रे भावा? आकाशाला भिडलेत सोन्या – चांदीचे दर…!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला आजपासून (दि. २०) सुरुवात झाली आहे. तुम्ही म्हणाल बातमी तर...

शनिशिंगणापूर इथं होणार 64 लाखांचा चौथरा ; प्रत्यक्ष कामाला झालाय प्रारंभ…!

नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर इथं भाविकांनी दिलेल्या दानातून ६१ लाखांचा चौथरा तयार करण्याच्या कामास प्रत्यक्ष...

मुंबईत बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते होणार डॉ.भाऊसाहेब शिंदे चा सन्मान

अहमदनगर : युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले...