उद्योग विश्वसीलबंद पाण्याची बाटली तपासण्याचाच 'एफडीए'ला अधिकार ; पण दूषित पाण्याची विक्री होत...

सीलबंद पाण्याची बाटली तपासण्याचाच ‘एफडीए’ला अधिकार ; पण दूषित पाण्याची विक्री होत असलेल्या ‘जार’चं काय? या गोरखधंद्यावर कोणाचाच राहिलं नाही नियंत्रण…!

spot_img

राज्याच्या अन्न औषध प्रशासनाला सीलबंद बाटलीतलं पाणी तपासण्याचाच अधिकार आहे. खुल्या किंवा फिरकी पद्धतीच्या जारमधील पाण्याची तपासणी करण्यासाठी कायद्यात कुठंही तरतूद नाही. याचाच गैरफायदा घेऊन नगर शहरात विविध ठिकाणी जारमधून दूषित पाण्याची विक्री केली जात आहे. अर्थात यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. दूषित पाण्याच्या जारची विक्री करणाऱ्यांवर कोणाचंच नियंत्रण नाही, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे.

मानवी आरोग्याच्या ज्या काही तक्रारी आहेत, त्या बहुतांश पाण्यातूनच निर्माण होतात. हल्ली वीस लिटर पाण्याचा जार दूषित पाणी विक्री करण्याचा एक प्रकारे बेकायदेशीर परवानाच ठरत असून धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनालादेखील त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही.

एका जारची किंमत 40 ते 45 रुपये आहे. या जारमध्ये असलेल्या पाण्यावर कुठल्याही प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जात नाही. अक्षरशः नळाला येणार पाणी या जारमध्ये भरलं जातं. अनेक ठिकाणच्या घरांमध्ये आणि सरकारी आस्थापनांमध्ये हे जारचं पाणी वापरलं जातंय.

जारमध्ये दूषित पाण्याच्या विक्रीमधून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. वीस लिटर जारची किंमत 45 रुपये आहे. सरासरी दररोज 200 जारची विक्री होते. तीन कोटी चाळीस लाख रुपयांची उलाढाल या माध्यमातून दररोज होत असते. आठ हजार जारमधून एक लाख साठ हजार लिटर पाण्याची एकट्या नगर शहरात दररोज विक्री होत आहे.

प्रशासनाला नसले तरी ‘यांना’ आहेत अधिकार…!

जारमध्ये दूषित पाण्याची विक्री केली जात असून यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. अन्न औषध प्रशासनाला याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे कायदेशीर अधिकार नाहीत. मात्र प्रत्येक शहराची जी लोकल बॉडी असते, त्या लोकल बॉडीच्या सदस्यांना जारच्या या गोरखधंद्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार आहेत. अर्थात ती लोकल बॉडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेत असायला हवी, हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...