नगर – लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित शिवपुत्र संभाजी नाटकाचा थरार आजपासून मोठ्या उत्साहात रंगणार आहे.प्रतिदिन ६० हजार आसन क्षमता असून प्रवेश विनाशुल्क असणार आहे.
कार्यक्रमाचे लेखन व दिग्दर्शन महेंद्र महाडिक यांनी केले आहे. स्वराज्याचा धगधगता इतिहास या ऐतिहासिक जनतेसमोर प्रदर्शित होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे संभाजीच्या मुख्य भूमिकेत असणार आहेत. आपल्या वाढदिवसा निमित्त ऐतिहासीक कार्यक्रम दाखवून आजच्या तरुणाई पुढे नवा आदर्श निर्माण करण्याचे कार्य लोकनेते निलेश लंके यांनी केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा कार्यक्रम लोकप्रिय मानला जात आहे. सबंधित कार्यक्रमाचा आणि राजकीय क्षेत्राचा काहीही संबंध नसला तरी यातून आगामी महानाट्य रंगणार आहे हे नक्कीच!
नगर – दक्षिण नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यातील नागरिकांनी या महानाट्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा इतकी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. नगर दक्षिणेतून व नगर शहरातून गेल्या आठ दिवसांपासून या कार्यक्रमाची चर्चा सुरू असून आगामी लोकसभा निवडणूक विखे विरुद्ध लंके अशीच रंगणार आहे.
मध्यंतरी खासदार डॉ.सुजय विखे यांनी देखील आपला वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. आता आता लंके यांचा वाढदिवस देखील तितकाच तुल्यबळ होत असल्याने या नगर जिल्ह्यातील दोन युवा नेत्यांची लॉबिंग लोकसभा निवडणुकीत दिसून येईल यात शंका नाही…