राजकारणआरक्षणाचा तिढा न सुटल्यामुळे लोकसभा - विधानसभा निवडणुकीत सकल मराठा समाज उभे...

आरक्षणाचा तिढा न सुटल्यामुळे लोकसभा – विधानसभा निवडणुकीत सकल मराठा समाज उभे करणार 1 हजार उमेदवार ; सोशल मिडियावर होतेय पोस्ट व्हायरल

spot_img

केंद्र आणि राज्य राज्य सरकारनं आरक्षणाचा तिढा सोडला नाही. नुसतीच फसवणूक केली. त्यामुळे केंद्रात आता सरकार स्थापन होऊच द्यायचं नाही, असा निर्धार सकल मराठा समाज बांधवांनी केल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात जिथं जिथं मराठा आणि ओबीसी आरक्षण आहे, तिथं तब्बल 1 हजार मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्यात येणार आहे. या आशयाची पोस्ट सोशल मिडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या दोन्हीही निवडणुकीसाठी उमेदवार फक्त मराठा समाजाचा असावा, हीच एक अट आहे. फक्त मराठा आरक्षणावरच लक्ष केंद्रित करणार, हाच मराठा उमेदवाराचा अजेंडा राहणार आहे.

यासाठी अशा आहेत अटी…!

*1)उमेदवार मराठा समाजातील दारिद्र्य रेषेखालील असावा.*
*2)त्यांच्या घरावर पत्रे ( टिन ) असणारा असावा.*
*3) दुसऱ्याच्या शेतात, दुकानावर रोजंदारी करणारा असावा.*
*4) गावापातळीवर आपणास योग्य वाटेल असा उमेदवार*

हे आहेत उमेदवार उभे करण्याचे फायदे !

*1)मराठा आरक्षणाची दाहकता राज्य सरकार,केंद्र सरकार व राष्ट्रपती यांना लक्षात येईल.*
*2) संविधानिक मार्गाने आपला लढा लढवू. व आरक्षण मिळवूच.*
*3) कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही.(दगडफेक, रस्ता रोको, जाळपोळ होणार नाही)*
*4) कुठलीही हिंसा होणार नाही.*
*5) मराठा बांधवांवर कुठलीही पोलीस केस होणार नाही.*
*6) 1000 उमेदवार उभे राहिल्यास आयोगास निवडणुका घेणं शक्यच होणार नाही. कारण तेवढ्या EVM मशीन्स उपलब्ध होणार नाहीत.
*7) तरुणांना कोर्ट कचेरीच्या कचाट्यात जायची वेळच येणार नाही.*
*8) इतके उमेदवार उभे केल्यानंतर निवडणुका झाल्या नाही तर केंद्रात सरकार स्थापन होणार नाही. याचं एकमेव कारण मराठा हेच असेल.
*9) मराठा आमदार, खासदार सभागृहात मराठा आरक्षणावर बोलतील. बाकीचे आपोआपच वठणीवर येतील.*
*10) महत्वाचं म्हणजे मराठा समाजाची एकजूट ) होईल.

असा होणार संभाव्य उमेदवाराचा निवडणूक खर्च…!

निधी किंवा लोकवर्गणी.

*एक निधी समाजासाठी*
*लेकरांच्या भविष्यासाठी*

*आजपर्यंत मराठ्यांनी सप्ताहासाठी, गणपतीसाठी, देवीसाठी, मंदिरासाठी लाखो निधी जमा केला आहेत. आता फक्त समाजासाठी एकदा जमा करा.*

*उमेदवार उभा करताना (25000 फॉर्म फीस व 5000 इतर खर्च ) एकूण 30 हजार रुपये खर्च हा गावातील प्रत्येक मराठा कुटुंबानं लोकवर्गणी जमा करुन करायचा आहे. त्यामुळे उमेदवाराला एक रुपयांही खर्च येऊ शकणार नाही.
उमेदवाराच्या 2 वेळच्या जेवणासह सर्व खर्च गावकऱ्यांनी करायचा आहे. निवडणूक खर्चासाठीचा निधी जमा करताना संबंधित संभाव्य उमेदवाराच्या सर्व कुटुंबियांचा सहभाग आवश्यक आहे.

यासाठी प्रामुख्यानं मराठा समाजाचाच सहभाग घ्यावा. यामागे उद्देश हाच, की सर्व मराठा समाज लोकवर्गणीच्या माध्यमातून पुन्हा एक होईल. गावातील मराठा कर्मचारी, व्यापारी, दुकानदार यांनी निधी जमा करण्यास मदत करावी.

निवडणूक काळात फक्त हेच करा…!

*उमेदवार उभे करणाऱ्या गावांनी आत्तापासूनच तयारीला लागा.*
*1)माणूस निवडावा, 2) लोकवर्गणी चर्चा करावी, 3) मराठा आरक्षण चर्चा सतत चालू ठेवावी.
येणाऱ्या निवडणूक काळात Evm मशिन्स बंद करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. मराठेतर लोकांना यातून हेच दाखवून द्यायचंय, की मराठा खडा, तो सरकार से भी बडा…!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनिशिंगणापूर इथं होणार 64 लाखांचा चौथरा ; प्रत्यक्ष कामाला झालाय प्रारंभ…!

नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर इथं भाविकांनी दिलेल्या दानातून ६१ लाखांचा चौथरा तयार करण्याच्या कामास प्रत्यक्ष...

मुंबईत बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते होणार डॉ.भाऊसाहेब शिंदे चा सन्मान

अहमदनगर : युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले...

लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाडचा नवरा करतोय ‘हा’ व्यवसाय…!

अगदी बालवयातच गायन कलेत उत्तुंग यश मिळवत भिंगारच्या कार्तिकी गायकवाडनं गायिलेल्या गाण्यातून महाराष्ट्राला वेड...

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...