राजकारणविकास हेच माझे ध्येय: डॉ.सुजय विखे पाटील..!

विकास हेच माझे ध्येय: डॉ.सुजय विखे पाटील..!

spot_img

अंकुश शिंदे / श्रीगोंदे : केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा असा संदेश सुद्धा त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत. त्याच बरोबर मतदार संघातील बुथ कमीटीच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन बुथ कमीट्या सक्षमिकरण करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी त्यांच्या सभा घेत प्रचाराची रणनिती कार्यकर्त्यांना समजावून सांगितली जात आहे.

भापजच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित सात्रळ तालूका राहूरी येथील कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुजय विखे यांनी केवळ विकास कामांची चर्चा करत उमेदवारांचा प्रचार करण्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात झालेल्या विकास कामे मतदारांपर्यंत पोहवा असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विरोधकांवर चर्चा करून त्यांना महत्व देऊ नका, मागील पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा राहील त्या व्यतिरिक्त कोणत्याही भूलथापांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये. तसेच सर्व स्थानिक हेवेहावे बाजूला ठेऊन ही निवडूक देशाची निवडूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी काम करा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...