‘पहिल्या टप्प्यातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आम्ही जाहीर केले आहेत. एका जागेवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला. कारण भाजपला आम्ही मोकळं रान देऊ इच्छित नव्हतो’, असं सांगत लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
ते म्हणाले, ‘मी सुरवातीपासूनच सांगत होतो, की शिवसेना आणि काँग्रेसचे सूत जुळलेले नाही. ते आता उघड होऊ लागलंय. राजकारणात सर्वांना सोबत घेऊन जायचं असतं. कोणाला बाजूला टाकायचं नसतं, असं आमचं मत आहे. महाविकास आघाडीच्या नावानं संजय राऊत हे चुकीची माहिती देत आहेत.
मराठा समाज गावागावातून या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देणार होता. परंतु आता प्रत्येक मतदारसंघातून एकच उमेदवार देण्याचं मराठा समाजाचं ठरलं आहे. याची अधिकृत माहिती जरांगे पाटील देणार आहेतच. मात्र इतरांना सोबत घेऊन आम्ही या निवडणुकीत जनतेसमोर जात आहोत’.