उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संगमनेर शहर सचिव समीर ओझा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नगर उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार उत्कर्षा प्रेमानंद रुपवते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार आहे. या संदर्भात ओझा यांनी संगमनेरच्या निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांच्याकडे छायाचित्रांसह दि. ५ रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्यामुळे उत्कर्षा रुपवते यांच्या अडचणींमध्ये वाढ होत झाली असून त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले आहेत.
हा प्रकार निवडणूक आयोगाच्या आदेशासह मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचेसुद्धा भंग करणारा आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हिंगे यांनी भरारी पथकाला तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र या पथकाचा नकारात्मक अहवाल आल्याने हिंगे यांनी समाधानकारकतेचा ठपका ठेवला. या संदर्भात खुलासा करण्याची रुपवते यांना नोटीसदेखील पाठवण्यात आली होती. मात्र सदर नोटिसीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचारात अल्पवयीन मुलाचा वापर करण्याचा हा प्रकार त्यांच्या संमतीनंच झाला असावा, असा निष्कर्ष काढत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, या आदेमुळे नगर उत्तर लोकसभा मतदारसंघात प्रचंड खळबळ उडाली आहे.