ब्रेकिंगइंडीया आघाडी म्हणजे खिचडी: देवेद्र फडणवीस.. खा विखेंना मताधिक्य देणार:- आ प्रा...

इंडीया आघाडी म्हणजे खिचडी: देवेद्र फडणवीस.. खा विखेंना मताधिक्य देणार:- आ प्रा राम शिंदे

spot_img

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण) – जामखेड – देशाचा नेता निवडायची ही निवडणूक आहे. देश कोण सुरक्षित ठेऊ शकतो. सर्व सामान्यांना कोण न्याय देऊ शकतो. तर मोदींचं नेतृत्वच हे सक्षमपणे करू शकते असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथे डॉ सूजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केले.

यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, खा.सुजय विखे, आ.प्रा.राम शिंदे, आ.सुरेश धस, मा.आ.भिमराव धोंडे, भाजपा महिला आघाडीच्या चित्रा वाघ, उमेश पाटील, डॉ भगवान मुरूमकर, अशोक खेडकर, अजय काशीद; पवन राळेभात, प्रा.सचिन गायवळ, सलीम बागवान, सचिन पोटरे, विष्णु गंभीरे; बाजीराव गोपाळघरे, रवि सुरवसे, शरद कार्ले, कैलास माने, महेश निमोणकर, सोमनाथ पाचरणे, प्रदिप टापरे, अर्चना राळेभात, अजिनाथ हजारे, अर्चनाताई राळेभात; संजीवनी पाटील, संध्या सोनवणे, प्रवीण चोरडिया, प्रवीण सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना देवेद फडणवीस म्हणाले की. इंडीया आघाडि म्हणजे २४ पक्षांची खिचडी आहे. त्यामुळे त्यांच्या ताळमेळ नाही. त्यांच्याकडे सर्व इंजिन आहेत डब्बेघ नाहीत यांच्या इंजीनमध्ये घराणेशाहीला जागा आहे सर्व सामान्यसाठी नाही. आ.राम शिंदे यांनी या मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली आहेत. दुसरे आमदार फक्त बोलबच्चन आहेत. राम शिंदे यांचा मी बेरर चेक आहे. मराठवाड्याच्या हिस्साचे पाणी आता या भागाला मिळणार आहे पश्चिमी वाहिन्यांचे पाणी नगर जिल्ह्यात वळवून दुष्काळमुक्त तालुके करू असे आश्वासन फडणीस यांनी यावेळी दिले. यावेळी आ. सुरेश धस म्हणाले की
ज्यांनी अयुष्यभर दुसऱ्याची घरं फोडली त्यांच घर आज फुटलं कोविड काळात विखेंचे काम फार मोठ आहे दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा विखे कुटुंबांनी फार केली आहे.

यावेळी खा सुजय विखे म्हणाले की २०१९ साली तुम्ही मला खासदार केले आपला विकास कागदावर नाही शहरात चार पदरी रस्ता होईल हे स्वप्नातही नव्हते विकास हा डोळ्याने दिसला पाहिजे आचारसंहिता लागण्यापूर्वी गडकरी साहेबांच्या माध्यमातून रस्ते केले महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास थांबला होता. समोरच्या उमेदवाराची माहिती पारनेरची जनता सांगतील त्यांनी खुप मोठी जनतेची पिळवणूक केली आहे.

यावेळी आ. राम शिंदे म्हणाले की ७० वर्षानंतर मतदार संघात मंत्री असतांना मोठा विकास केला या भागाची अडचण समजुन मला फडणवीस यांनी विधान परिषेदवर मला आमदार केले. विविध मागण्या करतांना कृष्णा भिमेचे पाणी जामखेड कर्जतला मिळाले पाहिजे. बाराशे एकरावर एमआयडीसीला मंजुरी दिली त्याची पुढील कारवाई लवकरात लवकर करावी व मोठ मोठ कंपन्यांचे उद्घाटन लवकर करावे अशी मागणी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सोनं – चांदी खरेदी करतोस का रे भावा? आकाशाला भिडलेत सोन्या – चांदीचे दर…!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला आजपासून (दि. २०) सुरुवात झाली आहे. तुम्ही म्हणाल बातमी तर...

शनिशिंगणापूर इथं होणार 64 लाखांचा चौथरा ; प्रत्यक्ष कामाला झालाय प्रारंभ…!

नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर इथं भाविकांनी दिलेल्या दानातून ६१ लाखांचा चौथरा तयार करण्याच्या कामास प्रत्यक्ष...

मुंबईत बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते होणार डॉ.भाऊसाहेब शिंदे चा सन्मान

अहमदनगर : युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले...

लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाडचा नवरा करतोय ‘हा’ व्यवसाय…!

अगदी बालवयातच गायन कलेत उत्तुंग यश मिळवत भिंगारच्या कार्तिकी गायकवाडनं गायिलेल्या गाण्यातून महाराष्ट्राला वेड...