गुन्हेगारीलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'या' पाच जणांना केलं अहिल्यादेवीनगरमधून हद्दपार...!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ पाच जणांना केलं अहिल्यादेवीनगरमधून हद्दपार…!

spot_img

अहिल्यादेवीनगरच्या (पूर्वीचे अहमदनगर) कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर रेकॉर्डवरील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या इसमांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 (1)  (अ) (ब) अन्वये अहमदनगर जिल्ह्याचे स्थलसिमेच्या हद्दीतून हद्दपार करणेबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत उपविभागीय दंडाधिकारी, अहमदनगर यांना पाठविण्यात आले होते.

यामध्ये 1) सुनिल विठ्ठल शिरसाठ (रा. बंगला नं. 9, पाच गोडावून शेजारी, शाहुनगर रोड, केडगाव, अहमदनगर), 2) क्षितीज अरुन अबनावे (रा. निलकमल रौ हौसिंग सोसायटी, दत्त सायकल मार्ट जवळ, सारसनगर, अहमदनगर), 3) अक्षय उर्फ भैरु बाबासाहेब कोतकर (रा. देवी मंदीराजवळ, मोहीनीनगर, केडगाव, ता. जिल्हा- अहमदनगर), 4) अक्षय बाबासाहेब दातरंगे, (रा. दातरंगे मळा, गाडगीळ पटांगण, अहमदनगर) आणि 5) विजय आसाराम रासकर (रा. चौधरी नगर, सारसनगर अहमदनगर) यांचे हद्दपार मंजुर झाल्याबाबतचे आदेश पोलीस स्टेशनला प्राप्त झाले.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे आदेशान्वये नमूद  हद्दपार इसम यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यांचे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे स्थलसिमेच्या हद्दीबाहेर त्यांचे इच्छितस्थळी सोडणेकामी पोलीस अंमलदार यांच्यासह रवाना करण्यात आले.

दरम्यान, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील इसमास अहमदनगर जिल्ह्याचे स्थळसिमेच्या हद्दीतून केले हद्दपार करण्यात आलं असून विजय रासकर असं त्याचं नाव आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्या आदेशान्वये नमुद हद्दपार इसमास पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्याचे कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे स्थलसिमेच्या हद्दीबाहेर त्यांचे इच्छीतस्थळी सोडणेकामी पोलीस अंमलदार यांचे सह रवाना केले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर शहर विभाग, अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे. सपोनि रवींद्र पिंगळे, सपोनिरी. योगीता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, पो.हे.कॉ. तनवीर शेख, शाहीद शेख, मोहन भेटे, पो.ना. अविनाश वाकचौरे, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, सुजय हिवाळे, अमोल गाडे, राम हंडाळ, राहुल मासाळकर यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...