गुन्हेगारीडी. एस. पी. राकेश ओला यांच्या धास्तीमुळे 'Dail 112' चादेखील होतोय सदुपयोग...!

डी. एस. पी. राकेश ओला यांच्या धास्तीमुळे ‘Dail 112’ चादेखील होतोय सदुपयोग…!

spot_img

दंगल, हाणामारी किंवा मारामाऱ्या यासारख्या घटनांची माहिती देण्यासाठी 100 हा नंबर अस्तित्वात असला तरी अलीकडे पोलीस यंत्रणेनं Dail 112 ही सुविधा सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन दिली आहे. काही महिन्यांपूर्वी या Dail 112 ची अवस्था अशी होती, की या नंबरवरुन अक्षरश: दारुडेदेखील फोन करून पोलिसांची थट्टा करायचे. मात्र अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात (अहमदनगर) जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला यांची नियुक्ती झाली आणि त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीची अनेकांनी धास्ती घेतली. त्याचाच परिणाम म्हणजे आजमितीला Dail 112 चा चक्क सदुपयोग व्हायला लागला आहे.

नगर अर्बन बँक बचाव समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि या बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनीच हा मजेशीर किस्सा ‘महासत्ता भारत’शी बोलताना सांगितला. काय आहे तो किस्सा, तुम्हीच वाचा. ते म्हणाले, ‘नगर अर्बन बँकेच्या घोटाळेबाज संचालकांपैकी अनेकजण फरार आहेत. काही जण स्वतःची ओळख लपवून राज्याबाहेर वास्तव्य करत आहेत. पोलीस अटक करतील या भीतीने 105 घोटाळेबाज संचालकांना एक प्रकारे ‘पळता भुई थोडी’ झाली आहे.

अमित वल्लभदास पंडित हे नगर अर्बन बँकेचे एक थकीत कर्जदार आहेत. काँग्रेसचे एक माजी मंत्री आणि विद्यमान आमदाराचे हे निकटवर्तीय असल्याचं बोलले जातंय.

अमित पंडित एका लग्न समारंभात आले होते. ही खबर Dail 112 वर काही जागरुक नागरिकांनी पोलिसांना दिली. या खबरेनंतर पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागली. याचा परिणाम असा झाला, अमित वल्लभदास पंडित या नगर अर्बन बँकेच्या थकीत कर्जदाराला अटक करणं पोलिसांना सोपं झालं. नगर जिल्ह्याचे एसपी राकेश ओला, ॲडिशनल एस पी प्रशांत खैरे, शहर विभागाचे डी. वाय. एस. पी. अमोल भारती या सर्वांनी नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्यावर प्रचंड अशी करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे Dail 112 चादेखील आता सदुपयोग होऊ लागला आहे’.

नगर अर्बन बँकेचे माजी संचालक आणि बँक बचाव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी हा जो किस्सा सांगितला, तो सामान्य नागरिकांसाठी खरोखरच अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. Dail 112 वर रात्री अपरात्री फेक कॉल करुन विनाकारण पोलिसांची धावपळ करण्यापेक्षा या नंबरचा चांगल्या कामासाठी यापुढे सदुपयोग व्हावा, अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जात आहे. दरम्यान, Dail 112 चं कामकाज कसं चालतं, यावर ‘महासत्ता भारत’ लवकरच एक छोटीशी डॉक्युमेंटरी करणार आहे.

असे येत होते  ‘Dail 112’ वर कॉल…!

एका खेडेगावातून ‘Dail 112’ वर मध्यरात्री एका दारुड्यानं माहिती दिली, की 25 ते 30 जण त्याला मारायला त्याच्या घराबाहेर आले आहेत. पोलिसांना लवकर पाठवा. नाही तर मोठी अप्रिय घटना घडू शकते. या कॉलनंतर नगरच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांना तात्काळ संपर्क साधून ज्या ठिकाणाहून फोन आला, त्या लोकेशनला जायला सांगितलं. अवघ्या दहाच मिनिटांत स्थानिक पोलीस त्या लोकेशनवर पोहोचले. पोलिसांना एका झोपडीत एक दारुड्या हातात फोन घेऊन झोपलेला दिसला. पोलिसांनी त्याला उठवलं आणि विचारलं ‘तु फोन केला होता का’?  तर अत्यंत निर्विकारपण तो म्हणाला, ‘हो दारुच्या नशेत मी फोन केला होता’. पोलिसांनी त्याला अटक केली आणि दोन दिवसानंतर समज देऊन सोडून दिलं. 

9 कोटींचं थकित कर्ज असलेल्या पंडित यांना नगर अर्बन बँकेनं दिलं 24 कोटींचं कर्ज…! 

नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्यातला तत्कालीन संचालकांनी केलेला पराक्रम थांबायचं नाव घ्यायला तयार नाही. या बँकेच्या आर्थिक घोटाळ्याचा हा पराक्रम सर्वसामान्यांना थक्क करायला लावणारा आहे. अमित वल्लभदास पंडित यांनी ‘कॉसमॉस’ बँकेचं नऊ कोटी रुपयांचं कर्ज थकवलं आहे. असं असतानादेखील नगर अर्बन बँकेच्या तत्कालीन घोटाळेबाज संचालकांनी पंडित यांना तब्बल 24 कोटी रुपये कर्ज दिलं. पंडित हे स्वतःच्या नावावर असलेली एक कंपनी मुलाला विकून परत तीच कंपनी पत्नीला विकायची, असा उलटा सुलटा ‘उद्योग’ करत होते, अशीदेखील माहिती समोर आली आहे. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनिशिंगणापूर इथं होणार 64 लाखांचा चौथरा ; प्रत्यक्ष कामाला झालाय प्रारंभ…!

नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर इथं भाविकांनी दिलेल्या दानातून ६१ लाखांचा चौथरा तयार करण्याच्या कामास प्रत्यक्ष...

मुंबईत बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते होणार डॉ.भाऊसाहेब शिंदे चा सन्मान

अहमदनगर : युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले...

लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाडचा नवरा करतोय ‘हा’ व्यवसाय…!

अगदी बालवयातच गायन कलेत उत्तुंग यश मिळवत भिंगारच्या कार्तिकी गायकवाडनं गायिलेल्या गाण्यातून महाराष्ट्राला वेड...

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...