गुन्हेगारीयालाच म्हणतात घोर कलियुग ; जीव वाचवणारा डॉक्टर बेमालूमपणे करतोय कोट्यवधींची आर्थिक...

यालाच म्हणतात घोर कलियुग ; जीव वाचवणारा डॉक्टर बेमालूमपणे करतोय कोट्यवधींची आर्थिक फसवणूक…!

spot_img

आपल्या धर्मग्रंथांमध्ये कलियुगाचं सविस्तरपणे वर्णन करण्यात आलं आहे. यामध्ये म्हटलं आहे, की चांगला पेहराव आणि चांगला व्यवसाय असलेली व्यक्ती जवळच्या व्यक्तींची बिनदिक्कतपणे फसवणूक करत विश्वासघात करील. हे आजच्या परिस्थितीत तंतोतंत खरं ठरत आहे. फ्रॉड किंवा फसवणुकीच्या अनेक बातम्या तुम्हाला आम्हाला वाचायला मिळत आहेत. यामध्ये सामान्य माणूस मात्र भरडला जात आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणाऱ्यांमध्ये आता डॉक्टरांचादेखील समावेश होऊ लागला आहे.

खरं तर डॉक्टर हा जीव वाचवणारा आणि अत्यंत विश्वासू, सहृदयी असा मित्र असतो. अर्थात आमचा हा लेख सर्वच डॉक्टरांबदल नाही. काही डॉक्टर खरोखरंच माणुसकी जपताहेत. रुग्णांशी प्रेमाने आणि विश्वासाने वागताहेत. मात्र काही डॉक्टर अक्षरशः केसानं गळा कापताहेत.

एखाद्यानं तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही त्या व्यक्तीचा विश्वासघात केला तर यापेक्षा दुसरं अघोरी कृत्य कुठलंच नाही. नगरमध्ये एक नव्हे दोन डॉक्टरांनी असाच विश्वासात करत एचडीएफसी बँकेला 8 कोटी 50 लाख रुपयांना चुना लावलाय. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत दोन दोन गगनचुंबी इमारतींमध्ये प्रशस्त असा दवाखाना थाटणाऱ्या डॉक्टरनं कोरोनाच्या काळात सामान्य जनतेला प्रचंड लुटलं आणि खोऱ्यानं नव्हे तर अक्षरशः जेसीबीनं पैसा ओढला.

अशा हावरट, स्वार्थी, मतलबी डॉक्टरनं सेवाभावी संस्थांचे विश्वस्त असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करुन बनावट कागदपत्रं सादर करत एचडीएफसी बँकेच्या स्टेशन रोड शाखेत 8 कोटी 50 लाख रुपयांचं कर्ज प्रकरण मंजूर करून घेतलं. हा डॉक्टर आणि त्याचा आणि दुसरा डॉक्टर मित्र अशा दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सखोल चौकशीनंतर आरोपींना अटक करु…!

या गंभीर होण्याचा तपास करत असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं, की फिर्यादी अमित कोठारी आणि अन्य काही जणांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जावरुन दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखोल चौकशीनंतर लवकरच त्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात येईल.

‘त्या’ डॉक्टरला आहे प्रादेशिक पक्षाच्या नेत्याचा वरदहस्त…!

लष्करी विभागाच्या बनावट परवानग्या आणून दवाखान्याच्या टोलेजंग आणि गगनचुंबी इमारती उभारुन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरला एका प्रादेशिक राजकीय पक्षाच्या नेत्याचा वरदहस्त असल्याचं बोललं जात आहे. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...