मुलगा कितीही लहान किंवा कितीही मोठा असला तरी तो आईसाठी एक पोटचा गोळा असतो मात्र एखादी आई तिच्या मुलाच्या जीवावर उठली तर समाजात मोठी खळबळ उडते पश्चिम बंगालमध्ये मात्र असंच काहीच एक प्रकरण समोर आला आहे प्रियकराच्या मदतीने एका महिलेने स्वतःच्या मुलाचा खून केला द्रुतगती न्यायालयाने त्या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली 1990 नंतर प्रथमतः ही सुनावणी झाल्याचं बोललं जात आहे.
पश्चिम जिल्ह्यातल्या हावडा द्रुतगती न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे. एका महिलेने 2015 साली तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केला होता. या मुलाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत एका सुटकेसमध्ये आढळून आला होता. फलकनामा एक्सप्रेसमध्ये ही सुटकेस पोलिसांना आढळली होती. पोलिसांनी तपास करत त्या मुलाची आई हसीना सुल्ताना आणि प्रियकर भानूशाह या दोघांना आंध्रप्रदेश मधून अटक केली होती.
आरोपी हसीना सुलताना हिचं गुंटूरमध्ये सासर होतं. अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन ती प्रियकरा सोबत पळून गेली होती. आंध्रप्रदेशच्या बंजारा हिल्स या परिसरातील उभे राहत होती मात्र अडीच वर्षाच्या मुलाचा त्या दोघांच्या प्रेमसंबंधात अडसर नको म्हणून त्या दोघांनी मिळून अडीच वर्षाची मुलीची हत्या केली होती.
मुलगी आणि नातवाचा काहीच शोध लागत नसल्यामुळे हसीना सुलतानाची आई त्या दोघांचा फोटो घेऊन ते दोघे हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. लहान मुलाचा फोटो सापडल्यानंतर त्या फोटोवरुन पोलिसांनी तपास केला आणि ही भयानक घटना सर्वांच्या समोर आली.