राजकारणमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या आडून काड्या करणाऱ्या 'त्याला' आवरा ; अन्यथा सगळंच बाहेर...

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या आडून काड्या करणाऱ्या ‘त्याला’ आवरा ; अन्यथा सगळंच बाहेर काढू : मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

spot_img

‘त्यो उंदरावणी उली उली मिशा वाढवून राज्याच्या ग्रामीण भागात फिरतोय. मराठ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम करतोय. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचे फोटो दाखून हे माझ्या मागं असल्याचं सांगतोय. हे असंच सुरु राहिलं तर यानंतर आम्ही सगळंच बाहेर काढू’, असा गंभीर इशारा मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी अजय बारस्कर याचं नाव न घेता राज्य सरकारला दिलाय.

अंतरवाली सराटीत सुरु असलेल्या उपोषणादरम्यान ते मिडियाच्या प्रतिनिधींशी बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले, ‘मराठ्यांच्या बाबतीत सरकारनं एवढा बारीक चाळणा का लावलाय? सरकार व्यापारी आहे का? आज 24 तारीख आहे. 6 तारखेला हरकती आल्या असून एवढ्या दिवस सरकार नक्की काय करतंय?

‘तो’ (अजय बारस्कर) ग्रामीण भागातल्या काही नाराज लोकांना सोबतीला घेऊन आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन मोडून काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्याचा पाठिंबा आहे. जर हे खरं असेल आणि तुम्ही जर मराठ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही तुमचं सगळंच बाहेर काढू .

‘त्याला’ (अजय बारस्कर) पण सांगतो, मराठ्यांच्या गद्दारीचा शिक्का पाठीवर बसून घेऊ नको. अन्यथा मराठे तुला नक्कीच उघडं करतील. तचझ्यासारखे अनेक जण मरिठ्यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रयत्न करताहेत. पण आम्ही सध्या कोणाचंही नाव घेत नाही. मात्र लवकरच सर्वांच्याच नावाचं पितळ उघडं पाडू, हा आमचा इशारा आहे’.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...