ब्रेकिंगमाँ बगलामुखी धाम,स्थापना दिवस संपन्न

माँ बगलामुखी धाम,स्थापना दिवस संपन्न

spot_img

नगर – माँ बगलामुखी धाम,उज्जैन मंदिर स्थापना दिवस तथा भतृहरि गुफाचे पीठाधीश्वर व अखिल भारतीय नाथ संप्रदायाचे मठाधिश श्री श्री १००८ योगी पीर श्री रामनाथजी महाराज यांचा जन्मदिवस निमित्ताने देवांचा देव महादेव अर्थात महाकाल उज्जैन,मध्यप्रदेश येथे संत सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी नगर मधील मंगल भक्त सेवा मंडळाचे मठाधीपती श्री विश्वेश्वर स्वामी महाराज(श्री राजाभाऊ कोठारी)याना आमंत्रित करण्यात आले होते.

या प्रसंगी पुजारींच्या वतीने माँ बगलामुखीची पुष्पांच्या माध्यमातून विश्व कल्याणाची प्रार्थना करण्यात आली.सकाळी ११.वा.१५१ पुजारींच्या वतीने मंदिरात चालू असलेल्या ११ कुंडी शतचंडी महायज्ञाची पूर्णाहुती देण्यात आली.दुपारी साधू-संत सत्संग सोहळा पार पडला.महंत रामनाथजी महाराज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आंध्रप्रदेश येथून आलेल्या युवतींनी कुचीपुडी नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या धार्मिक सोहळा कार्याप्रसंगी गुरुवर्य श्री विश्वेश्वर स्वामी महाराज(श्री राजाभाऊ कोठारी)तथा अध्यक्ष मंगल भक्त सेवा मंडळ,अहिल्यानगर व बालयोगी उमेशनाथजी महाराज(खासदार,राज्यसभा) यांना आमंत्रित करण्यात आले होते.

फोटो-माँ बगलामुखी धाम,उज्जैन मंदिर स्थापना दिवस निम्मित आयोजलेल्या साधू-संत सत्संग सोहळा मध्ये श्री विश्वेश्वर स्वामी महाराज(श्री राजाभाऊ कोठारी) यांचा सन्मान करण्यात आला

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिस्तबद्ध अशा पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची बारकाईनं काळजी घ्या : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना…!

आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. जगातला सर्वात शिस्तबद्ध असा हा पालखी...

कांद्याची निर्यात 35 टक्क्यांनी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्याच्या प्रश्नावर काहीच बोलत नाही, यावरुन मध्यंतरी मोठी नाराजी पसरली होती....

8 लाख 69 हजारांची ‘इर्टिगा’ मिळतेय 3 लाख 95 हजारांना ; कसला विचार करताय मग?

वाहन विक्रीच्या क्षेत्रातल्या नामांकित मारुती कंपनीची इर्टिगा या लोकप्रिय कारला 1462 cc ची चार...

नगरच्या प्रदूषण महामंडळातल्या ‘या’ मस्तवाल अधिकाऱ्यानं केलाय बेजबाबदारपणाचा कळस; त्रस्त नागरिकांचा गंभीर आरोप…!

नगरच्या प्रदूषण नियंत्रण महामंडळातल्या कार्यालयात उपप्रादेशिक अधिकारी या पदावर असलेल्या चंद्रकांत शिंदे नावाच्या अधिकाऱ्यानं...