राजकारण'महासत्ता भारत' बिग ब्रेकिंग न्युज ...! केंद्र सरकारनं केलं CAA संदर्भात...

‘महासत्ता भारत’ बिग ब्रेकिंग न्युज …! केंद्र सरकारनं केलं CAA संदर्भात नोटीफिकेशन जारी ; आज रात्रीपासूनच या कायद्याची होऊ शकते अंमलबजावणी…!

spot_img

2019 साली ज्या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती, तो सीएए कायदा CAA आज रात्रीपासूनच लागू होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे, की केंद्र सरकारनं नुकतंच या कायद्यासंदर्भात एक महत्त्वाचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. केंद्रातल्या भाजप सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी या कायद्याला प्रचंड विरोध झाला. 

दरम्यान, या कायद्यानुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांत होणाऱ्या अन्याय अत्याचाराला कंटाळून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, पारशी आणि ईसाई या गैरमुस्लिम प्रवाशांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.

या कायद्यानुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांतल्या अल्पसंख्यांक नागरिकांना अधिकृत कागदपत्रांशिवाय भारतीय नागरिकत्वाचा फायदा मिळणार आहे. डिसेंबर 2019 मध्ये हा कायदा मंजूर झाला होता. परंतु अद्यापपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकारातून हा कायदा लागू करण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे ज्या काँग्रेसने या कायद्याची शिफारशी केली होती, त्या काँग्रेसला देखील हा कायदा लागू करता आलेला नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...