लेटेस्ट न्यूज़दापोली गाव राज्याच्या पर्यटनाच्या नकाशावर: अतिक्रमणमुक्त गावाच्या दिशेने वाटचाल., हिवरे बाजारच्या धर्तीवर...

दापोली गाव राज्याच्या पर्यटनाच्या नकाशावर: अतिक्रमणमुक्त गावाच्या दिशेने वाटचाल., हिवरे बाजारच्या धर्तीवर दापोलीत आता वॉटर ऑडिट.!

spot_img

पालघरः (प्रतिनिधी योगेश चांदेकर) पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दापोली या गावाचा कायापालट करण्याचा ध्यास सरपंच हेमंत संखे यांनी घेतला असून त्यांच्या या निर्णयाला ग्रामस्थांचाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या छोट्याशा गावात पर्यटन विकास तसेच अन्य कामांवर भर देण्यात आला आहे.

राज्य आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार आणि भास्करराव पेरे पाटील यांच्यासारख्यांना संखे हे कामांच्या बाबतीत आदर्श मानतात. गाव करील ते राव करील काय असे आपल्याकडे म्हटले जाते; परंतु याच गावाला सोबत घेऊन विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करता येते हे त्यांनी गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या व्यासपीठावर सरपंचांना एकत्र आणून त्यांच्यासोबत गावातील प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना याबाबत विचारविनिमय करून, विचारांचे आदान प्रदान केले जाते.

दापोली झाली अतिक्रमणमुक्त
संखे यांनी गावातील अतिक्रमणे आणि रहदारीतील अडथळे दूर करण्यासाठी मोहीम उघडली. या मोहिमेत त्यांना माजी जिल्हाप्रमुख वैभव संखे, उपसरपंच रोहित पिंपळे,ग्रामपंचायत सदस्य रचिता पाटील, पोलिस पाटील दौलत पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश संखे,मंगेश पाटील,सूर्यकांत पाटील,विनोद संखे,वसंत संखे,किरण संखे, रोशन संखे,आदींनी चांगले सहकार्य केले. या मोहिमेदरम्यान गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केल्यामुळे गाव अतिक्रमण मुक्त झाले आहे. कोणीही विरोध न करता स्वतः अतिक्रमणे काढण्यासाठी पुढे आले. आता अतिक्रमण काढण्यास सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार करण्याचा मानस सरपंच संखे यांनी व्यक्त केला.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना
दापोलीची लोकसंख्या सुमारे एक हजार आहे. हे गाव तीन विभागात विभागले आहे. दापोली हे पालघरपासून जवळ असल्याने आणि इथला निसर्ग नितांत सुंदर असल्याने येथे पर्यटनाला वाव आहे, हे लक्षात घेऊन हेमंत संखे यांनी दापोली या गावाला राज्याच्या पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचे काम केले आहे. त्यासाठी मोठा निधी आणून त्यातून विविध कामे सुरू केली आहेत. गावासाठी निधी कुठून आणि कसा मिळवायचा याची त्यांना चांगलीच माहिती असल्याने त्याचा फायदा गावाला झाला आहे.

पर्यटकांचे आकर्षण
या गावात मंदिरे, तलाव, जैव विविधतेने युक्त असे पक्षी निरीक्षणासाठीचे उत्तम ठिकाण, नारळ संशोधन केंद्राची बाग, रॉक कॅम्पिंग अशा विविध सुविधा आणि आकर्षण येथे आहेत. बाहेरच्या पर्यटकांना येथे आणून त्यामाध्यमातून गावाला उत्पन्न कसे मिळेल, असा प्रयत्न सुरू आहे.

तीन कोटींच्या कामांना प्रारंभ
गेल्या महिन्यात संखे यांनी तीन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना प्रारंभ केला. त्यात प्रमुख रस्ते, आंबेडकर नगर येथील स्मशानभूमी विसावा शेड तसेच या परिसरात पेपर ब्लॉक बसविणे, प्रवेशद्वार कमान, पंचम रोड अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, ग्रामपंचायत परिसरात पेवर ब्लॉक बसविणे आदींचा समावेश आहे.

पाण्याचे नियोजन करणार
दापोली येथे पाण्याची कायम टंचाई असते. त्यामुळे यापुढे हिवरे बाजारच्या धर्तीवर येथे वॉटर ऑडिट करण्यात येणार आहे. पडणाऱ्या पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार पाण्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पावसाचे पडणारे पाणी वेगवेगळ्या जलसंधारण योजनांच्या माध्यमातून आडवून ते जिरवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सरकारी योजनातून काय काय करता येईल, याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे दापोली पाणीटंचाईमुक्त होईल.

शोभिवंत माशांचे युनीट
महिलांसाठी शोभिवंत माशाचे युनिट/प्रकल्प बांधून पूर्ण असून या आठवड्यात त्याचे लोकार्पण करून महिलांना आर्थिक सक्षमीकरण च्यादिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचे काम संखे यांच्या पुढाकाराने होणार आहे.या शिवाय वृद्धांना विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...