गुन्हेगारीप्राणघातक हत्यारं आणि दुचाकीसह दोघे जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई...!

प्राणघातक हत्यारं आणि दुचाकीसह दोघे जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई…!

spot_img

दि. 25. 04. 2024 रोजी 9 . 30 वाजण्याच्या सुमारास पो. नि. प्रताप दराडे यांना कल्याण रोड, दिपाली हॉटेल शेजारी, मोहटा देवी, अहमदनगर येथे दोन इसम एक मोटर सायकलवरुन त्यांच्या हातात लोखंडी कोयते घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा, शिवीगाळ करीत परिसरातल्या लोकांमध्ये दहशत करीत काही तरी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली.

पो. नि. प्रताप दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाच्या सपोनि योगिता कोकाटे यांना पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन कारवाई करा, असे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे स. पो. नि. योगिता कोकाटे या पोलीस स्टाफ व पंचासह बातमीतील नमुद ठिकाणी गेल्या. तेथे दोन इसम बातमीप्रमाणे हातात कोयते घेऊन मोटर सायकलवर बसलेले होते तसेच आवेशपूर्ण हावभाव, शिवीगाळ करीत होते. पोलीस स्टाफची खात्री होताच त्यांना जागीच पकडले.

सपोनि कोकाटे यांनी त्यांना पोलीस व पंचांची ओळख करुन देऊन त्यांस विश्वासात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावं किरण रविंद्र सोनवणे (वय 20 वर्षे, रा. MIDC लामखडे पेट्रोल पंपामागे अहमदनगर), महेश पाटिलबा खेमनर (वय 35 वर्षे राह कडेगाव शाहूनगर, अहमदनगर) अशी सांगितली. त्यांच्या ताब्यात 30,000/- रु किं. ची दुचाकी TVS व्हिक्टर मो. सा. (नं एम एच 19 व्हि 8755) सह 1000/- रुपये किंमतीचे दोन लोखंडी कोयते, त्याच्या पात्यास एका बाजुने धार असलेली व पुढील टोक निमुळते व टोकदार असलेले असे मिळून आले.

स.पो.नि. योगिता कोकाटे यांनी पंचासमक्ष नमुद मुद्देमाल जप्त केला. नमुद दोन्ही इसमांना कारवाईकामी पोलीस स्टेशनला त्याचे ताब्यात मिळालेल्या प्राणघातक हत्यार लोखंडी कोयते व दुचाकीसह आणण्यात आले. पो.कॉ. प्रमोद लहारे यांचे फिर्यादीवरुन नमूद आरोपीविरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर गु.र.नं. 529/2024 शस्र अधिनियम 1959 चे कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि. योगीता कोकाटे, पो. हे. कॉ. शाहीद शेख, योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, संदीप पितळे, पो. ना. अविनाश वाकचौरे, म. पो. ना. संगिता बडे, पो. कॉ. अभय कदम, दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, सुरज कदम, सचिन लोळगे, सुजय हिवाळे यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...