राजकारणप्रभाग दोन व चार मधून खासदार विखेंना मताधिक्य देणार- उषाताई नलावडे

प्रभाग दोन व चार मधून खासदार विखेंना मताधिक्य देणार- उषाताई नलावडे

spot_img

नगर- सावेडीतील प्रभाग २ व ४ मधील प्रभागात महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार आहे असे प्रतिपादन माजी नगरसेविका उषाताई नलावडे यांनी केले
सावेडीतील निर्मलनगर येथे संतोष गर्जे,सचिन वारे,मंगेश निसळ यांच्या वाढदिवसानिमित्त खा विखे आले असता त्यांचा सत्कार उषाताई नलावडे यांनी केला.यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे,अभय आगरकर,महेश तवले,नितीन शेलार,संपतराव नलावडे,संगीता खरमाळे,नगरसेवक सुनील त्र्यंबके,विनिल पाऊलबुद्धे,रूपाली वारे,संध्या पवार,बाळासाहेब पवार,निखिल वारे आदी उपस्थित होते
प्रभाग क्रमांक २ व ४मध्ये खासदार विखे यांनी ७ कोटीची कामे केली आहेत,त्या जोरावर सर्वात जास्त मतदान या प्रभागात होईल त्यासाठी महायुतीच्या भाजपा ,शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी प्रचाराचा प्रारंभ केला आहे,विखे यांनी वयश्री योजना,कोविड काळात केलेली मदत,शिर्डी दर्शन,राम मूर्ती स्थापना कार्यक्रम आदी समाजपयोगी कार्य त्यांनी केलेले आहे असेही त्या म्हणाल्या
यावेळी संतोष गर्जे,सचिन वारे,मंगेश मिसळ यांच्या वाढदिवसानिमित्त खा विखे सह अनेकांनी अभिस्टचिंतन करून त्यांना शुभेछया दिल्या
फोटो- सावेडीतील संतोष गर्जे, सचिन वारे ,मंगेश निसळ यांच्या वाढदिवसानिमित्त खा विखे आले असता त्यांचा सत्कार उषाताई नलावडे यांनी केला. समवेत बाबासाहेब वाकळे,अभय आगरकर ,महेश तवले , संपतराव नलावडेआदी उपस्थित होते

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...