अहिल्यादेवीनगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून नेमणुकीला असलेल्या नंदकिशोर सांगळे यांचा मुलगा रोहन नंदकिशोर सांगळे (वय 25) यानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नेत्रदीपक यश मिळवलं आहे. रोहन यानं श्रीगोंदा तालुक्यातल्या पारगाव इथल्या स्वामी विवेकानंद मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नाशिक युनिव्हर्सिटीमधून बी.ए.एम.एस. ही डॉक्टर पदवी मिळवत चांगल्या गुणांनी तो उत्तीर्ण झाला आहे.
त्याचे वडील नंदकिशोर सांगळे हे अहमदनगर पोलीस दलात एमआयडीसी पोलीस स्टेशनला हवालदार पदावर कार्यरत असून आई गृहिणी आहे. तसेच रोहनची बहीण पायल नंदकिशोर सांगळे ही विखे पाटील मेडिकल कॉलेज विळद घाट याठिकाणी फिजिओथेरपीमध्ये द्वितीय वर्षात डॉक्टरचं शिक्षण घेत आहे.
वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पदार्पण केल्याबद्दल डॉ. रोहन सांगळे यांचं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, ग्रामीण पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले आदींसह अनेकांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘शुध्द बिजापोटी फळ रसाळ गोमटी’…!पोलिसांबद्दल हल्ली फारसं चांगलं बोललं जात नसलं तरी सारेच पोलीस वाईट समजून त्या सर्वच पोलिसांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही. आईवडील जर सुसंस्कृत आणि प्रामाणिक असले, नितीमत्तेनं वागणारे असले तर अपवाद वगळता काही मुलांवर तसे सुसंस्कार होतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मतानुसार ‘शुध्द बिजापोटी फळ रसाळ गोमटी’ हे यामुळे अधोरेखित झालं आहे.