राजकारणपालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी कडून आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी.....

पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी कडून आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी.. आ.राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल; आ.पाटील आक्रमक आणि प्रश्न तडीस नेणारा नेता…!

spot_img

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघातून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यावर अखेर बहुजन विकास आघाडीचे एकमत झाले. या लोकसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे बळ लक्षात घेता आता तिरंगी लढत रंगतदार होणार आहे. दरम्यान, पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर बहुजन विकास आघाडी उमेदवार देणार, की नाही याची चर्चा सुरू होती राज्यात बहुजन विकास आघाडीचा महायुतीला पाठिंबा असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत हा पक्ष उतरणार नाही अशी शक्यता व्यक्त होत होती; परंतु आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा पक्षाचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. अंतिम निर्णय मात्र आमदार ठाकूर हेच घेणार होते.

यांच्या उपस्थितीत भरला अर्ज
पालघर लोकसभा क्षेत्रासाठी बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी आज अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री मनीषा निमकर, प्रभाकर पाटील, उमेश नाईक, नितीन भोईर आदी उपस्थित होते.

भूसंपादनातील गैरव्यवहारावर आंदोलने
बहुजन विकास आघाडीच्या बैठकीत सर्वांनी आमदार राजेश पाटील यांचे नाव एकमताने सुचवले आणि अखेर त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आ. पाटील हे अतिशय आक्रमक आणि सर्वसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नेते आहेत. भूसंपादनातील गैरव्यवहार तसेच अनेक मुद्द्यांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवून हे प्रश्न सोडवण्यास भाग पाडले आहे.

अधिक मतदार पाठिशी असल्याने लढत निर्णायक
शहरी, डोंगरी आणि सागरी अशा तीन भागात जरी हा मतदार संघ विभागलेला असला, तरी नागरी भागाच्या मतदाराची संख्या जास्त आहे आणि बहुजन विकास आघाडीचे तीनही आमदार नागरी भागातील असल्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या समर्थक मतदारांची संख्या या लोकसभा मतदारसंघात जास्त आहे. आमदार राजेश पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

ही नावे होती चर्चेत
पालघऱ मतदारसंघातून उमेदवारीसाठी माजी खासदार बळीराम जाधव, माजी मंत्री मनीषा निमकर, जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव, संतोष बुकले, पांडुरंग गोवारी यांची नावे चर्चेत होती; त्यामुळे लोकसभेसाठी चर्चेत असलेल्यांनी आमदार पाटील यांनी निवडणूक लढवावी असे ठरवल्याने आमदार राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

कुटुंबातूनच वारसा
आमदार राजेश पाटील यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्यांचे आजोबा हिराजी पाटील हे पंचायत समितीचे उपसभापती होते. आमदार पाटील यांनीही ठाणे जिल्हा परिषद सदस्य, वसई पंचायत समिती सभापती आदी पदावर काम केले आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी अन्य दोन उमेदवारांपुढे आव्हान निर्माण केले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी प्रचार सुरू केला आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी प्रचार सुरू केला असला, तरी अजून महायुतीत ही जागा कोणाला आणि उमेदवार कोण हे अद्याप ठरलेले नाही. अशा पार्श्वभूमीवर आता आमदार पाटील हे आक्रमकपणे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असून त्याच्या उमेदवारीचा धसका महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी घेतला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...