गुन्हेगारीपालघरमधे विदेशी दारूवरील सर्वात मोठी कारवाई,..  एक कोटी सहा लाख 72 हजारांचा...

पालघरमधे विदेशी दारूवरील सर्वात मोठी कारवाई,..  एक कोटी सहा लाख 72 हजारांचा मुद्देमाल हस्तगत!  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि तलासरी पोलिसांची धडक कारवाई..!

spot_img

पालघरः (योगेश चांदेकर) मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी तपासणीनाक्यानजीक विदेशी दारूने भरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईत एकूण एक कोटी सहा लाख 72 हजार चारशे चौतीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दरम्यान पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंतची ही विदेशी दारूवरील ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दापचरी सीमा तपासणी नाक्याजवळ पाळत ठेवली होती. पालघर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच तलासरी पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. हरियाणावरून मुंबईमार्गे गुजरातला जाणारा विदेशी दारूचा हा ट्रक पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये अकराशे पेट्यांत हे विदेशी मद्य होते. ट्रक खाली करून त्याचा हिशेब करण्यास पोलिसांना सात-आठ तास लागले. ‘सेल फॉर पंजाब’ असे लिहिलेले मद्य हरयाणाहून मुंबईमार्गे गुजरातला आणि तिथून पंजाब असा द्राविडी प्रकार कशासाठी चालला होता, हे गूढच आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही विदेशी दारू कोठे जात होती आणि ती कुणासाठी पाठवली जात होती याचा तपास करण्याचे मोठे आव्हान आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच तलासरी पोलिसांसमोर आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल विभुते, तलासरीचे सहायक पोलिस निरीक्षक देवरे, पोलिस उपनिरीक्षक गणपत सुळे, उपनिरीक्षक चौधरी, राजपूत, बजरंग अमनवाड, मुंडे आदींनी या कारवाईत भाग घेतला.

ट्रकचा क्रमांकही बनावट – विशेष म्हणजे या ट्रकला लावलेली क्रमांकाची पाटी बनावट होती. बनावट क्रमांक वापरून या ट्रकमधून विदेशी दारूची वाहतूक केली जात होती, हे तपासात उघड झाले आहे. तलासरी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक तसेच बनावट क्रमांकाचा वापर आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सीमाभागात बनावट दारुचे पेव- 
पालघर जिल्हातील अनेक तालुके हे गुजरातच्या सीमेनजीक आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात दमणची बनावट दारू विकली जात आहे. वास्तविक बिअर शॉप मध्ये फक्त बियर विकायला परवानगी असताना येथे अनेक प्रकारच्या देशी, विदेशी मद्याची विक्री केली जाते. त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही. सीमेपलीकडून चोरट्या मार्गाने दमणची बनावट दारू येत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र केवळ तोंडदेखली कारवाई करीत आहे.

उत्पादन शुल्कचे लागेबांधे – अनेक ठिकाणी बियर बार रेस्टॉरंट चालकाशी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या बिअर शॉपमध्ये सर्रास बनावट दारूची विक्री होत असतानाही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. बिअर शॉपच्या पुढे किंवा मागे चायनीज भुजिंग सेंटर काढून तिथेच बियर शॉप चालकांकडून अवैध रित्या मद्य पिण्याची व्यवस्था केली जात असून या सर्वांशी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण संबंध असल्याने पालघर जिल्ह्यात सर्वत्र बनावट दारू, बनावट बियर तसेच परदेशी मद्याचा महापूर आला आहे.

पोलिसांची कारवाई आणि उत्पादनशुल्क थंड – स्थानिक पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत दारू विक्रीची माहिती मिळत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाला ती माहिती का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही महिन्यांत पालघर जिल्हा पोलिस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवैध मद्य तसेच अन्य प्रकरणात कारवाई केली असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाला मात्र आत्तापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात यश का आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...