राजकारणदालमंडईत हनुमान चालीसा पाठ संपन्न

दालमंडईत हनुमान चालीसा पाठ संपन्न

spot_img

नगर – शहरांमध्ये विविध ठिकाणी हनुमान चालीसा पठण कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे,दालमंडईत मध्ये हनुमान चालीसा संपन्न झाली व भजन संध्याने आज परिसर दुमदुमला
मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या चे २३ वे पुष्प भारत सरकार मित्र मंडळच्या वतीने आडते बाजार दालमंडई,जय आनंदमहावीर चौक येथे या भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हनुमान चालीसाच्या कार्यक्रमात भक्तीचे रंग गाण्यातून भाविक भक्तानी उधळले.नागरिकांनी सामुदायिक पठणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.राजाभाऊ कोठारी यांनी यावेळी प्रबोधन केले . त्यानंतर हनुमान चालीसा गायन व विविध भजने सादर झाली.हनुमानाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमात खा सुजय दादा विखे पाटील यांनी सर्व सामान्य जनते सोबत हनुमान चालीसा पठण केले यावेळी भारत सरकार मित्र मंडळाचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हा सचिव बंटी भाऊ डापसे,भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष अभय आगरकर,अशोक जोशी,राजू जोशी,भाजपाचे वसंत लोढा,शिवसेना शहरप्रमुख दिलीपदादा सातपुते,मा.सभापती सचिन जाधव, माजी नगरसेवक संजय डापसे, मा.महापौर बाबासाहेब वाकळे, महेश तवले,संपत नलावडे,दीपक दायमा,बाली जोशी,ओम पांडे,नितीन शेलार,जितेंद्र डापसे आदीसह मोठ्या संख्नेने भाविक भक्त उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारत सरकार मित्र मंडळच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.हनुमान चालीसा कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले
फोटो-दालमंडईत मध्ये भारत सरकार मित्र मंडळच्या हनुमान चालीसा पाठ व भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...