राजकारणगुढी पाडव्याला निलेश लंके च्या प्रचाराला नगरमध्ये प्रारंभ

गुढी पाडव्याला निलेश लंके च्या प्रचाराला नगरमध्ये प्रारंभ

spot_img

नगर-शहर महाविकास आघाडीची बैठक होऊन दी.९ एप्रिल रोजी गुढीपाडवा या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीचे उमेदवार आ.निलेश लंके यांच्या प्रचारचा शुभांरभ सकाळी 9:00 वा.शिवालय,चितळे रोड ऑफिस येथे गुढी उभारून करण्यात येणार आहे अशी माहिती आघाडी कडून देण्यात आली यावेळी शिवसेनेचे युवा नेते विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर व अभिषेक कळमकर(राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार)संभाजी कदम,काँग्रेसचे किरण काळे आदी उपस्थित होते.
माजी मंत्री अनिलभैय्या राठोड यांच्या संपूर्ण संरक्षण , संपूर्ण सुविधा व निरंतर समाजसेवा हा मुद्दा घेऊन ९ तारखेपासून आम्ही प्रत्येक नगरकरांना भेटणार आहोत,सध्या नगर मधील जे दहशतीचे वातावरण,ताबेमारी,युवकांना रोजगार मिळत नाही हे जनतेला सांगणार आहोत व विजयाची गुढी उभारून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे युवा नेते विक्रम राठोड यांनी सांगितले.
नवे वर्ष,नवी सुरुवात..नव्या यशाची नवी रुजवात…याप्रमाणे करण्यात येणार आहे, तरी तरी महाविकास आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो- नगर मध्ये दी. ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा या शुभमुहूर्ता वर महाविकास आघाडीचे उमेदवार आ.निलेश लंके यांच्या प्रचारचा शुभांरभ शिवालय,चितळे रोड येथे गुढी उभारून करण्यात येणार आहे अशी माहिती देताना शिवसेनेचे युवा नेते विक्रम राठोड समवेत माजी महापौर भगवान फुलसौंदर व अभिषेक कळमकर(राष्ट्रवादी काँग्रेस,शरद पवार) संभाजी कदम,काँग्रेसचे किरण काळे आदी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...