‘तो’ एक ड्रायव्हर होता. त्याला एक पत्नी होती तिच्यापासून दोन मुलंदेखील झाली आहेत. मात्र एका लग्नसमारंभात त्याला ‘ती’ भेटली आणि दोघांचं सूत जुळलं. त्यांनी लग्नदेखील केलं. मात्र काही वर्षांनी ‘ती’ त्याला प्रतिसाद देत नव्हती.
मग त्यानं तिची माहिती घ्यायला सुरुवात केली. ती माहिती घेत असताना त्याला तिचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण लागली. त्यानं तिला चिमुकल्यासह एका हॉटेलवर बोलवलं.
चिमुकल्याला ज्यूसमधून विष दिलं. तिच्या डोक्यात दगड घातला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. काल अर्थात दि
13 सायंकाळी नागपुरातल्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड हादरला आहे.
ड्रायव्हर सचिन राऊत (रा. दिनननगर, इसासनी), त्यांची दुसरी पत्नी नाजनिन सचिन राऊत (एकात्मता नगर) आणि चिमुकला युग राऊत अशी मृतांची नावं आहेत. ड्रायव्हर सचिन राऊत हा मध्यप्रदेशमध्ये एका नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. तिथं त्याला नाजनिन भेटली. तो तिच्या प्रेमात पडला. दोघांनी लग्न केलं. मात्र ही बाब त्याच्या पहिल्या पत्नीला माहित नव्हती.
पोलिसांनी हॉटेलमधल्या रूमची तपासणी केली असता मोठा धक्कादायक प्रकार समोर आला. चिमुकल्या यशच्या तोंडातून फेस आला होता. तर नाजनिनच्या डोक्यात हातोडा मारल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांना त्या ठिकाणी करारनामादेखील आढळून आला.
नाजनिनशी संबंध तोडत असून चिमुकल्या युगची जबाबदारीदेखील नाजनिनवर टाकत असल्याचं त्या करारनाम्यात म्हटलं आहे. ड्रायव्हर सचिन राऊतनं आत्महत्या केल्याची माहिती नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे यांना देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या रुमचा दरवाजा तोडून मृतदेह पोस्टमार्टमसाठी परवाना केले. दरम्यान, या घटनेप्रकरणी खून आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.