राजकारणतुम्ही खुशाल एकटेच उमेदवार जाहीर करताय? अशा पध्दतीनं आघाड्या चालतात का? 'वंचित'चे...

तुम्ही खुशाल एकटेच उमेदवार जाहीर करताय? अशा पध्दतीनं आघाड्या चालतात का? ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर भडकले…!

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसनं (शरद पवार गट) बारामतीतून सुप्रिया सुळे यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. तर शिवसेनेनं (उध्दव ठाकरे गट) उत्तर – पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर चांगलेच भडकले असल्याचं काल (दि. ११) पहायला मिळालं. खुशाल एकटेच उमेदवार जाहीर करत आहात, हे तुम्हाला मान्य आहे का? अशा पध्दतीनं आघाड्या चालतात का, असे प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केले.

वंचित बहुजन समाज पक्षाचे नेते आंबेडकर यांनी एका पोस्टच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे गट) नेतृत्वावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे, की ‘तुम्ही आम्हाला सर्व चर्चा आणि बैठकांपासून बाजूला ठेवत आहात. चर्चा करून तरी लोकसभा निवडणुकीतला उमेदवार जाहीर करा. आम्ही अशी आशा करतो, की सर्वजण एकत्र बसून या मुद्द्यावर समाधान निघेल आम्ही आजही अधोरेखित करतो, की महाविकास आघाडी बद्दल आम्ही आजही सकारात्मक आहोत’.

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांचे उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसचे संजय निरुपम नाराज झाले आहेत. निरुपम हे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. कीर्तीकर यांच्या उमेदवारीवरून निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील आरोप केले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...