‘येणाऱ्या 2047 मध्ये तुमच्या घरातला अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नातू ज्यावेळेस तुम्हाला विचारील, ‘बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगरमध्ये आले होते, त्यावेळी तुम्ही काय केलं’? त्यावेळी त्याला तुम्ही काय सांगाल? ‘त्यावेळी मी भाजपसाठी माझे अनेक रात्र आणि अनेक दिवस दिले’, हे त्याला अभिमानानं सांगा, असं वक्तव्य भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
अहिल्यानगर (अहमदनगर) सावेडी शहराच्या उपनगरात असलेल्या कोहिनूर मंगल कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अभय आगरकर, प्रा. भानुदास बेरड, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बाबा सानप, निशांत दातीर, दत्तात्रय खेमनर आदींसह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.