हैदराबादच्या नालगोंडा जिल्ह्यातली ही मोठी चमत्कारिक घटना आहे. जदाला मालविका ही नालगोंडा जिल्ह्यातली मुलगी स्वतःला पोलीस अधिकारी समजत होती. तब्बल बारा महिने ती महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या युनिफॉर्म मध्येच राहील एवढेच नव्हे तर तिच्या साखरपुड्याला ती महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘युनिफॉर्म’मध्येच आली आणि तिच्या होणाऱ्या नवर्याला संशय आला. त्यानंतर मात्र भलतंच काही तरी समोर आलं.
मालविका हिला लहानपणापासूनच पोलीस अधिकारी बनायचं होतं तिच्या आई-वडिलांचीदेखील तशी इच्छा होती. निजाम कॉलेजमधून तिने एम एस सीचं शिक्षण पूर्ण केलं आणि 2018 मध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये एस आय म्हणजे सब इन्स्पेक्टर पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला. परंतु दृष्टीदोषामुळे शारीरिक क्षमता चाचणीत ती अपयशी ठरली आणि तिनं लेखी परीक्षादेखील दिली नाही.
मालविका हिना ड्रेस कोड बद्दल माहिती मिळवली आणि तसा ड्रेस शिवून घेतला. सिकंदराबादमध्ये आरपीएफचा लोगो, स्टार, शोल्डर बॅज, बेल्ट आणि बुटांची खरेदी केली. त्यानंतर तिनं एक बनावट ओळखपत्रही तयार केलं. विशाखा डिव्हिजनमध्ये खरी नोकरी लागल्यासारखी तयारी तिनं केली होती, असं पोलिसांनी सांगितलं. 2019 मध्ये मालविका हिनं तोतया पोलीस सब इन्स्पेक्टर बनून रेल्वेने प्रवास केला विशेष म्हणजे अनेक ठिकाणी महिला पोलीस अधिकारी म्हणून तिचा सन्मान देखील करण्यात आला. मात्र हे सर्व बनावट होतं हे लक्षात आल्यानंतर तिला अटक करण्यात आली.
एकंदरित, मनातल्या इच्छेनुसार शारीरिक क्षमता नसताना आणि सरकारी परीक्षा दिलेली नसताना रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये RPF सरकारी नोकरीत असल्याचा मालविकानं केलेला बनाव पोलिसांच्या लक्षात आला आणि त्यानंतर तिला तुरुंगाची हवा खावी लागली.