गुन्हेगारीजमीन ताबखोरांविरोधात झोपडपट्टीदादा कायद्यानुसार कारवाई करा गृहमंत्र्यांकडे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांची...

जमीन ताबखोरांविरोधात झोपडपट्टीदादा कायद्यानुसार कारवाई करा गृहमंत्र्यांकडे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांची मागणी..!

spot_img

जमीन ताबखोरांविरोधात झोपडपट्टीदादा कायद्यानुसार कारवाई करा गृहमंत्र्यांकडे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांची मागणी..!

अहमदनगर शहरातील उपनगर मध्ये मारवाडी गुजराती समाजातील व्यक्तींच्या जमिनी शोधून त्याच्यावर बेकायदेशीर ताबा मारणारे विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत राज्याचे गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन द्वारे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मागणी केली आहे.

अहमदनगर शहरांमध्ये सावेडी उपनगर व केडगाव उपनगर या भागामध्ये शहराचे प्रमाणावर हद्द वाढ झालेली आहे. या विकासात बिल्डर व जमिन मालकांचे मोठे योगदान आहे असे असताना सावेडी उपनगरामध्ये मारवाडी व गुजराथी समाजाचे व्यक्तींचे जमिन पाहुन राजकीय आर्शिवादाने पोसलेले गुंड बेकायदेशीर पणे ताबा मारुण खंडणी मागण्याचा प्रकार करतात.

पोलीस प्रशासन ही या प्रकारकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करीत आहे व पिढीत व्यक्तींना पोलीसांकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने पोलीसांकडून सदरचा विषय हे दिवाणी स्वरुपाचा असल्याने आम्ही मदत करु शकत नाही. असे उत्तर मिळत असल्याने पिढीत व्यक्ती झालेल्या अन्याया विरोधात उघडपणे दाद मागण्याचे धाडस करीत नाही. त्यामुळे नाविलाजास्तव जमिन कमी किंमतीत राजकीय मंडळींना विकावे लागते. नाहि तर संबधीत गुंडाना खंडणी देऊन त्याची कोणतीही वाच्यता करता तडजोड करावी लागते.

हे ताबे मारणारी टोळी कोणाला तरी कायदेशीर उभे करुन न्यायालयामध्ये खोटे दावे दाखल करुन सदर जमिनीचे लेटीकेशन तयार करुन ब्लॅकमेलींग करीत आहे. असेच प्रकार केडगांव उपनगरात व आरणगांव रोड या ठिकाणी सुध्दा राजरोस पणे सुरु आहे.

आरणगांव रोड वर काही व्यक्तींनी संघटीत टोळी तयार करुन मोकळया जमिनीवर ताबा मारलेला आहे व संबधीत भुखंडधारकास सदरचा ताबा सोडण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात स्थानिक पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार करुन हि तक्रारकर्त्यास न्याय मिळत नाही.

उलट या ताबे मारणा-या च्या टोळीस पाठीशी घालण्यात येत आहे. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर
स्वरुपाचा असून त्यामुळे करोडो रुपयांची जमिनी खरेदी घेऊन बेकायदेशीर ताबा मारण्याचा प्रकारामुळे व्यापारी वर्ग भयभीत झालेला आहे. ते जमिनीत गुंतवणुक करण्यास धाडस करीत नाही. ही बाब विकासाच्या दृष्टीकोनातुन हानिकारक आहे.

तरी आपणास विनंती करण्यात येते की, वरील प्रकरणाची वरीष्ठ स्तरावरुन सखोल चौकशी होवून अशी बेकायदेशीर ताबे मारणा-या च्या विरोधात महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभटटीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगारी, धोकादायक व्यक्ती प्रतिबंध अधिनियम व भारतीय दंड विधानसंहिता अन्वये गुन्हा दाखल होवून प्रतिबंध करण्यात यावे व त्यांचे राजकीय गॉड फादर यांनाही सहआरोपी करण्यात यावे.

या गुन्हेगारी पार्श्वभुमी कडे दुर्लक्ष करणारे पोलीस अधिकारी विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेख यांनी राज्याचे गृहमंत्री. अपर मुख्य गृहसचिव. पोलीस महासंचालक. विशेष पोलीस महानिरीक्षक. पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...