उद्योग विश्वगुजरातच्या 'या' उद्योगपतीनं घेतला प्रचंड खळबळजनक निर्णय ; बातमी वाचल्यानंतर तुम्हीसुद्धा थक्क...

गुजरातच्या ‘या’ उद्योगपतीनं घेतला प्रचंड खळबळजनक निर्णय ; बातमी वाचल्यानंतर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल…!

spot_img

मानवी जीवनात पैसा परमेश्वर नसला तरी परमेश्वरापेक्षा निश्चितच कमी नाही. पैशासाठी आज कोण कुकल्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. सख्खा भाऊ पैशांसाठी पक्का वैरी होतो. मित्र एकमेकांचे दुश्मन होतात. पैसा चार चौघांतून माणसाला उठवतो, असं पैशाबद्दल बोललं जातं. मानवी जीवनात या पैशाला अतिशय महत्त्व आहे. कारण पैसा असेल तर माणसाला ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगता येतं. पण एखाद्याकडे करोडो रुपयांची संपत्ती असेल आणि ती व्यक्ती उद्योगपती असेल त्यातल्या त्यात ती व्यक्ती जर गुजरातची असेल तर आणखी उद्योग कसा भरभराटीला जाईल, हेच ती व्यक्ती पाहिलं. मात्र गुजरातच्या ‘या’ उद्योगपतीनं प्रचंड खळबळजनक असा निर्णय घेतला आहे. भावेश भंडारी असं या उद्योगपतीचं नाव असून या उद्योगपतीनं 200 कोटी रुपये दान देऊन पत्नीसह दीक्षा घेत संन्याशाचं जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे.

आयुष्यभर कमविलेली करोडो रुपयांची संपत्ती दान देऊन स्वतः आणि पत्नीलादेखील संन्याशी करण्याची किमया या व्यक्तीनं करून दाखवली आहे. येत्या दि. 22 एप्रिल रोजी अनेकांसह या दांपत्याचीदेखील दीक्षा होणार आहे. विशेष म्हणजे भावेश भंडारी यांच्या मुलांनी यापूर्वीच दीक्षा घेतली आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. या दोन्ही मुलांपासून प्रेरणा घेत त्यांनी जैन समाजात दीक्षा घेण्याचा हा निर्णय घेतलाय.

गुजरातच्या सांबरकाठा इथल्या ऐश्वर्यसंपन्न कुटुंबात भावेश भंडारी लहानाचे मोठे झाले. सर्व ऐश्वर्य, सुखसंपन्न त्यांच्या पायाशी लोळण घेत होतं. मात्र या सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल सोशल मिडियावर प्रचंड आश्चर्य व्यक्त केलं जात असून रकानेच्या रकाने भरून भावेश भंडारी आणि त्यांच्या या निर्णयाबद्दल आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...