राजकारणखा. सदाशिव लोखंडे यांचा फॉर्म भरल्याच्या चर्चेऐवजी रंगली भलतीच चर्चा...!

खा. सदाशिव लोखंडे यांचा फॉर्म भरल्याच्या चर्चेऐवजी रंगली भलतीच चर्चा…!

spot_img

अहिल्यानगर उत्तर लोकसभा मतदार संघात (शिर्डी) विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज (दि. २२) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विधान परिषदेचे अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद झाली. मात्र या पत्रकार परिषदेत राजू वाघमारे हे नेते चक्क झोपल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या चर्चेपेक्षा नेते वाघमारे हे पत्रकार परिषदेत झोपल्याचीच चर्चा जास्त रंगली.

डॉ. नीलम गोऱ्हे या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधत होत्या. तेवढ्यात त्यांच्याशेजारी नेते वाघमारे हे झोपी गेल्याचं सर्वच उपस्थितांच्या लक्षात आलं. बराच वेळ हे सुरू होतं. अखेर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाघमारे यांना हलवून उठविल्यानंतर ते खडबडून जागे झाले.

वातावरणातला उष्मा आणि एसीची थंडाई…!

दरम्यान, आज तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. प्रचंड कडक ऊन पडल्यानं अनेकजण घामाघूम झाले होते. मात्र डॉ. नीलम गोऱ्हे यांची जिथं पत्रकार परिषद सुरू होती, तिथं एसीमुळे थंड हवा होती. त्याचा परिणाम असा झाला, की नेते राजू वाघमारे यांना भर पत्रकार परिषदेत चांगलीच झोप लागली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...