हल्लीच्या शिक्षण क्षेत्रातल्या यशानंतर नोकरीसाठी ‘शॉर्ट कट’ शोधण्यावर भर दिला जातो. मात्र तो मिळाला नाही तर अनेकांचं मन खचून जातं. अशा मनानं खचलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक नव्हे अनेक सरकारी नोकऱ्या ज्या मुलीला मिळाल्या, त्या मुलीची विशेष मुलाखत आम्ही प्रसारित करत आहोत.
ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, स्वतःच्या ज्ञानावर, सद् सद् विवेक बुद्धीवर विश्वास असतो, ते नेहमी संयमी असतात. संयम बाळगत ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात. अशा विद्यार्थ्यांना अनेक सरकारी नोकऱ्यांची संधी स्वतःहून येते. नेवासे तालुक्यातल्या सोनईजवळ असलेल्या खेडले परमानंद इथल्या आघाव परिवारातली अक्षता राजेंद्र आघाव हिची यशोगाथा ‘महासत्ता भारत’च्या राज्यभरातल्या कोट्यवधी वाचकांसाठी आम्ही सादर करत आहोत.
भारत सरकारच्या जीएटी विभागाच्या मुंबईतल्या कार्यालयात अक्षता आघाव सध्या नोकरी करत आहे. यापूर्वी तिला पोलीस उपनिरीक्षक पदाची नोकरीसुद्धा मिळाली होती. मात्र यापेक्षा वेगळं काही तरी करायचं, असा ध्यास घेतलेल्या अक्षतानं अपयशाला खचून गेलेल्या मुला-मुलींसमोर एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता शेवटपर्यंत नक्की पहा… अक्षताची ‘महासत्ता भारत’नं घेतलेली विशेष मुलाखत…!