गेल्या पंधरा महिन्यांच्या कालावधीत कमीत कमी वीज बील यावं, यासाठी वीज मीटरमध्ये फेरफार करून कॉन्ट्रॅक्टर बी. एस. सोनवणे यांनी लाखो रुपयांची वीज चोरी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कॉन्ट्रॅक्टर सोनवणे यांनी 2 लाख 66 हजार 834 युनिटची वीज चोरी केली असून त्याची किंमत अधिभारासह 46 लाख 15 हजार 762 रुपये इतकी होते. या चोरी प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला.
या चोरीबाबत आशिष
नरेंद्र नावकार (वय 38 वर्षे, व्यवसाय – नोकरी – वि. वि. कं. मर्या. मध्ये नोकरी. पत्ता – भरारी पथक, म. रा. वि. वि. कं. मर्या, मंडळ कार्यालय, स्टेशनरोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली.
कॉन्ट्रॅक्टर सोनवणे यांनी मोरया चिंचोरे (ता. नेवासा) येथील त्यांच्या जागेत असलेल्या वीजमीटरमध्ये वीज वापराची नोंद कमी प्रमाणात होईल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करुन वीजचोरी केली, हे स्पष्ट झाल्यानं आणि त्यांनी दि. 22. 03. 2024 रोजी 17:15 वाजण्यापूर्वी सुमारे 15 महिन्यांच्या कालावधीत महावितरण कंपनीचं 46 लाख 15 हजार 762 रुपयांचं नुकसान केलं आहे. ही रक्कम आजपर्यंत न भरल्यानं विद्दुत कायदा – 2003 मधील कलम 135 नुसार आरोपी कॉन्ट्रॅक्टर बी. एस. सोनवणे यांच्या विरोधात कायदेशीर फिर्याद देण्यात आली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ तमनर हे करत आहेत.