उद्योग विश्वकेंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेअंतर्गत कोण होऊ शकतं लाभार्थी? सविस्तर वाचा आणि...

केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेअंतर्गत कोण होऊ शकतं लाभार्थी? सविस्तर वाचा आणि घ्या जाणून…!

spot_img

मित्रांनो, केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध असलेली मुद्रा लोन ही योजना युवकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पैशांअभावी अनेक युवक स्वतःचा उद्योग सुरू करू शकत नाहीत. मात्र केंद्र सरकारची योजना युवकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेसाठी कोण कोण लाभार्थी होऊ शकतं, याची माहिती या लेखात आम्ही तुम्हाला देत आहोत, तेव्हा ती सविस्तरपणे वाचा…!

केंद्र सरकारने 2015 मध्ये योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कुठल्याही गॅरंटीशिवाय तुम्ही दहा लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकता. नॉन कोऑपरेट आणि नॉन अग्रिकल्चर व्यवसाय तुम्ही या मुद्रा लोन योजनेअंतर्गत करू शकता. सहकार आणि शेती क्षेत्रात तुम्ही जर व्यवसाय करू इच्छित असाल तर यासाठी तुम्हाला मुद्रा लोन योजना अंतर्गत कर्ज मिळणार नाही, हे लक्षात घ्या एकदा.

शेती आणि सहकार क्षेत्राच्या व्यतिरिक्त तुम्ही सर्वच व्यवसायासाठी या योजनेत 50 हजारांपासून तर 1 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता. पाच वर्षांच्या मुदतीत तुम्हाला हे कर्ज फेडायचं आहे यासाठी तुमचं वय 18 वर्षाच्या पुढे असायला हवंय. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी अर्ज करू शकता.

यासाठी आधार कार्ड जात प्रमाणपत्र बँकेतले करंट अकाउंट, उद्योग आधार नंबर पॅन कार्ड अधिक कागदपत्रं तुम्हाला जमा करावी लागतात. तर मग तज्ञ व्यक्तीकडून माहिती घ्या आणि या कर्जाचा लाभ घ्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विद्यार्थी मित्रांनो! तयार आहात ना? कारण उद्या लागणार आहे 12 वीचा निकाल …!

राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष लागून होतं. अखेर राज्याच्या शिक्षण मंडळानं बारावीच्या निकालाची...

सोनं – चांदी खरेदी करतोस का रे भावा? आकाशाला भिडलेत सोन्या – चांदीचे दर…!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला आजपासून (दि. २०) सुरुवात झाली आहे. तुम्ही म्हणाल बातमी तर...

शनिशिंगणापूर इथं होणार 64 लाखांचा चौथरा ; प्रत्यक्ष कामाला झालाय प्रारंभ…!

नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर इथं भाविकांनी दिलेल्या दानातून ६१ लाखांचा चौथरा तयार करण्याच्या कामास प्रत्यक्ष...

मुंबईत बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते होणार डॉ.भाऊसाहेब शिंदे चा सन्मान

अहमदनगर : युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले...