गुन्हेगारीकुख्यात गुंड तुकाराम पवार विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करा; विष्णुपंत ढाकणे यांचं...

कुख्यात गुंड तुकाराम पवार विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करा; विष्णुपंत ढाकणे यांचं एसपी राकेश ओला यांना निवेदन…!

spot_img

गुन्हेगारी क्षेत्रात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या गुन्ह्यातला मुख्य आरोपी कुख्यात गुंड तुकाराम पवार यानं गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून गंभीर गुन्हे घडवून आणले आहेत. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून तो टोळीप्रमुख म्हणून काम करतो. मात्र पांढरे कपडे घालून स्वतःला प्रतिष्ठित समजून पाथर्डी शहरात फिरत आहे.

कुख्यात गुंड पवारच्या टोळीनं आतापर्यंत अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, जालना, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये खून, दरोडे, रस्ता लूट, मारामाऱ्या, जबरी चोऱ्या, घरफोड्या, खिसे कापणे, महिला आणि मुलींची छेड काढणे, बलात्कार, अवैध सावकारी करत जमीन किंवा प्लॉट बळकावणे, सरकारी जागेवर अतिक्रमण करणे असे उद्योग केले असून त्याच्याविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचं निवेदन
शिवसेनेच्या शिंदे गटाचे पाथर्डी तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे यांनी अहिल्यानगरचे एसपी राकेश ओला यांना नुकतंच दिलंय.

ढाकणे यांनी या निवेदनात म्हटलं आहे, की कुख्यात गुंड तुकाराम पवार याचे दोन सख्खे भाऊ लक्ष्मण धोंडिबा पवार आणि सुरेश धोंडीबा पवार हे अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करुन आणि पोलिसांचा धाक दाखवून कुख्यात पवार यानं आजपर्यंत अनेक प्रकारचे गुन्हे घडवून आणले आहेत. पवार याचा साडू रविंद्र उर्फ भोरु म्हस्के (रा. कोरडगाव ता. पाथर्डी) हा पवारचा मुख्य साथीदार आहे. परजिल्ह्यामध्येदेखील पवार याचे साथीदार असून त्यांची सविस्तर माहिती गोळा करून पवार याच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.

या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आदींना पाठवण्यात आल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...