कल्याण रोड अनुसया नगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून महालक्ष्मी महिला जॉगिंग ट्रॅकचा लोकार्पण सोहळा संपन्न विकास कामांची भूमिका मांडण्याचे काम नगरकरांनी करावे: आमदार संग्राम जगताप
नगर : शहराचा अनेक वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केले,असल्यामुळेच राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी मोठा निधी प्राप्त झाला असून, टप्प्याटप्प्याने शहर विकासाची कामे मार्गी लागत आहे. यासाठी विकास कामांची भूमिका मांडण्याचे काम नगरकरांनी करावे, शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू असून महिलांना कल्याण रोड परिसरामध्ये स्वतंत्र जॉगिंग ट्रॅक असावा यासाठी निधीची उपलब्धता करून दिली.
युवराज शिंदे यांच्या पाठपुराव्यातून हा लाल मातीचा जॉगिंग ट्रॅक तयार झाला आहे . त्या माध्यमातून या परिसरातील महिलांचे आरोग्य सदृढ निरोगी राहण्यास मदत होईल शिंदे कुटुंबीयांनी महालक्ष्मी मंदिराची निर्मिती केली असल्यामुळेच या भागातील नागरिक एकत्र येऊन मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम संपन्न करत असतात.
कल्याण रोड परिसराच्या विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. कल्याण रोड परिसरामध्ये विकास कामाच्या माध्यमातून शहराचे विकसित उपनगर निर्माण होत आहे. सीना नदीवरील पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असल्यामुळे सुमारे 27 कोटी रुपये निधी उपलब्ध होऊन कामाला सुरुवात झाली आहे.
लवकरच हे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण रोड परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. कल्याण रोड अनुसया नगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून महालक्ष्मी महिला जॉगिंग ट्रॅक कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, मा. अध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजित खोसे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, इंजि. केतन क्षीरसागर, आयोजक युवराज शिंदे, संभाजी चौधरी, लक्ष्मण खोडदे, शिवाजी शिंदे, कुंडलिकराव आरोडे, राहुल मापारी, दत्तात्रेय मरकड, महेंद्र मैड, शंतनु दुबे पाटील, रोहित काळोखे, भैय्या मुंडलिक, विवेक खोसे, उमेश धोंडे, विजय विश्वकर्मा, अर्चना रसाळ, दुर्गा बोरगावकर, भारती चौधरी, अर्चना परकाळे, सीमा खोसे, वंदना ढोरे, अकबर तांबोळी, जनाबाई आरडे आदि उपस्थित होते युवराज शिंदे म्हणाले की, कल्याण रोड परिसर हा नगर शहराच्या जवळचा भाग म्हणून ओळखला जात आहे.
त्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे. त्यांना विकासाच्या मूलभूत प्रश्नांपासून सुविधांदेण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. अनुसया नगर परिसरातील एक-एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावले जात आहे. या भागाचा अत्यंत गंभीर पाणीप्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी सोडविला आहे. त्यांच्या माध्यमातून कल्याण रोड परिसरामध्ये महिलांसाठी सर्वात मोठ्या जॉगिंग ट्रॅकची निर्मिती केली आहे.
त्यामुळे महिलांना स्वतंत्र लाल मातीचा ट्रॅक उपलब्ध झाला आहे.कल्याण रोड परिसरामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकासाची चांगली कामे उभे राहत आहे, असे ते म्हणाले. टँकर मुक्त कल्याण रोड परिसराचा अनेक वर्षांचा गंभीर पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम केले असून, गणेश नगर परिसरामध्ये 15 लाख लिटर पाण्याच्या टाकीची निर्मिती केली. तसेच याच ठिकाणी संपवेल तयार करून टाकीद्वारे सर्वांना फेज टू पाणी योजनेद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पंधरा दिवसाला सुटणारे पाणी आता तीन दिवसाला सुटत असल्यामुळे टँकर मुक्त कल्याण रोड निर्माण झाले आहे.
आता या भागाचा विकास झपाट्याने होत असून नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे. लवकरच कल्याण रोड परिसर हे शहराचे विकसित उपनगर म्हणून ओळखले जाईल, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी मांडले.