लेटेस्ट न्यूज़ऐय्याश डॉ. भास्कर मोरे अखेर झाला गजाआड ; नगर एलसीबीच्या पथकानं केली...

ऐय्याश डॉ. भास्कर मोरे अखेर झाला गजाआड ; नगर एलसीबीच्या पथकानं केली कारवाई…!

spot_img

दिनांक 20/10/2022 रोजी पिडीत फिर्यादी हिला रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचा (ता. जामखेड) संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे पाटील याने फार्मसी कॉलेजचे प्रिन्सीपल ऑफिसचे ऍ़न्टी चेंबरमध्ये बोलवून घेवून पिडीतेशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. सदर घटनेबाबत दिनांक 08/03/2024 रोजी जामखेड पो.स्टे.गु.र.नं. 104/2024 भादंविक 354, 354 (अ) प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थींनी आरोपी संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे पाटील यास अटक करणे करीता जामखेड येथे उपोषणास बसल्या होत्या. सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर यांना आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले होते.

नमूद आदेशान्वये पोनि आहेर यांनी दिनांक 09/03/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हेमंत थोरात, पोउनि/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बबन मखरे, भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सागर ससाणे, अमोल कोतकर, भाऊसाहेब राजू काळे, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव, चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे यांचे 2 विशेष पथके तयार करुन पथकास आरोपीची माहिती काढून त्यास ताब्यात घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

वरील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा शिक्षीत व सधन असल्याने आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एका पथकाने आरोपीचे मित्र व नातेवाईक यांचेकडे जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, बारामती, पुणे परिसरात चौकशी सुरु केली.

दुसरे पथक हे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेत होते. त्या दरम्यान असे लक्षात आले की, आरोपी हा वेगवेगळी 7-8 नवीन सिमकार्ड वापरुन पोलीसांना सुगावा लागू नये, याचा प्रयत्न करत होता. एसीबीच्या पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण व नातेवाईकांकडे केलेल्या चौकशी दरम्यान पोनि  आहेर यांना आरोपी भास्कर मोरे हा पळसदेव, भिगवण, जिल्हा पुणे येथे त्याचा नातेवाईक नामे अशोक चव्हाण याचेकडे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्या माहितीनुसार दोन्ही पथके ही आरोपीचा नातेवाईक अशोक चव्हाण यांचे राहते घरी पळसदेव, भिगवण येथे पोहचली असता नमुद आरोपी हा तेथून देखील पोलीस पथक पोहचण्या आधीच निघून गेल्याचे समजलं. त्यानुसार पथकाने तात्काळ पळसदेव, भिगवण, ता. इंदापुर, जिल्हा पुणे येथील परिसरात आरोपीचा शोध घेता तो ऊसाच्या शेतात लपून बसलेला मिळून आल्याने त्यास पथकानं ताब्यात घेतले.

त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे पुर्ण नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) भास्कर रामभाऊ मोरे (वय 52, रा. जामखेड बस स्टॅण्ड मागे, ता. जामखेड) असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीस जामखेड पो.स्टे.गु.र.नं. 104/2024 भादंविक 354, 354 (अ) या गुन्ह्याचे तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास जामखेड पो.स्टे. करत आहे.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...