मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, यासाठी जे आंदोलन करायचं असतं, त्यासाठी परवानगी घेणं सरकारनं बंधनकारक केलं आहे. हाच नियम सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनादेखील लागूं आहे, असा विचार करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेनिमित्त ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही, म्हणून केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या सभेचे बॅनर फाडण्यात आले. या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात असलेल्या टुनकी गावात हा प्रकार घडलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर शहरातल्या खडकेश्वर तिथं असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्या (दि.६) सभा होणार आहे. त्या सभेपूर्वीच अजय साळुंके या नावाच्या व्यक्तीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बॅनर फाडले.
यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा लाख मराठा, अशा घोषणादेखील देण्यात आल्या. आम्हाला उपोषण करायचा असेल आंदोलन करायचं असेल तर संबंधित विभागाच्या परवानगी घ्याव्या लागतात. त्यामुळे तुम्हीदेखील आमच्या गावात बॅनर लावण्यापूर्वी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली पाहिजे, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावर महायुतीत भाजपकडूनदेखील दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या (दि. ५) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे.