राजकारणआई-बाबांच्या मतदानासाठी मुलांचा संकल्प.. साडेसात लाख मुलं पालकांना घालणार साकडं; ...

आई-बाबांच्या मतदानासाठी मुलांचा संकल्प.. साडेसात लाख मुलं पालकांना घालणार साकडं; अधिकाधिक मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाची मोहीम

spot_img

पालघरः निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ‘स्वीप’ विभाग मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतो. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळा महाविद्यालयातील मुलांमध्ये संकल्पपत्र भरून घेण्यात येत आहेत. संकल्प पत्राच्या माध्यमातून मुलांनी आई-वडिलांना मतदानासाठी प्रवृत्त करावे असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे पावणे चार लाख मुलांनी संकल्पपत्रे भरून दिली असून साडेसात लाख मुले संकल्पपत्र भरून पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा आणि प्रत्येक घरातील मतदान घडवून आणण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या अंतर्गत ‘स्वीप’ हा विभाग काम करत असतो. पालघर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी आणि ‘स्वीप’ कक्षाच्या प्रमुख विजया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत.

पालकांच्या मतदानासाठी पाल्यांची जनजागृती
या विभागांतर्गत चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रिल्स स्पर्धा, पथनाट्य, प्रभात फेरी, मानवी रांगोळीच्या माध्यमातून देशाचा नकाशा तयार करणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यातील अशा उपक्रमाला बोईसर महाविद्यालयातील सुमारे तीन हजार विद्यार्थी उपस्थित होते. त्यांना निवडणुकीत पालकांनी मतदान करावे यासाठी संकल्प पत्र भरून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यापुढेही सायकॉलॉथॉन, मॅरेथॉन, ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून विविध उपक्रम, बाईक रॅली आदीचे आयोजन करण्यात येणार आहे.

आमच्या ‍भवितव्यासाठी करा मतदान…
आमचे चांगले भवितव्य घडवायचे असेल आणि देशाला विकासाच्या मार्गावर द्यायचे असेल, तर आई-बाबा तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत मतदान केलेच पाहिजे, अशी हाक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी पालकांना घालत आहेत आणि त्या प्रकारची संकल्प पत्रे भरून घेतली जात आहेत. पालघर जिल्ह्यात अशी साडेसात लाख संकल्प पत्र भरून घेण्यात येत आहेत.

निवडणूक साक्षरता मंडळे कार्यान्वित
जिल्ह्यातील ४५ महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्याच्या नोडल अधिकाऱ्यांची तसेच विद्यार्थी प्रतिनिधी नेमणूक करण्यात आली आहे. या विद्यार्थी प्रतिनिधींना ईव्हीएम हाताळणी व अन्य प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील जवळपास ६०३ शाळांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्या माध्यमातूनदेखील जनजागृती सुरू आहे.

तुमच्या मतदानाने घडेल आमचे भविष्य
लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या या मतदानाच्या मूलभूत अधिकारातूनच देशाच्या भविष्याची पायाभरणी केली जात असते. नोंदणीकृत असणारे मतदार आणि प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या यामध्ये मोठी तफावत असते. ही तफावत भरून काढण्यासाठी आता पालकांच्या प्रबोधनावर भर देण्यात आला असून, त्यासाठी त्यांच्याच पाल्यांचा उपयोग करून त्यांना भावनिक साद घातली जात आहे. प्रत्येक प्रौढ नागरिकांनी मतदान केले पाहिजे. तो त्यांचा हक्क आणि कर्तव्यदेखील आहे आणि या हक्क आणि कर्तव्यातूनच आमचे भविष्य उज्वल करायचे आहे, अशा प्रकारचा हट्ट ही मुले आई-बाबांना घालत आहेत. त्यासाठी लाखो विद्यार्थी पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्राचा वापर करून पालकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाच मागितली एक कोटीची, तडजोडीअंती द्यायचे ठरले 30 लाख ; पण घात झाला, पाच लाख घेताना अँटी करप्शन विभागानं एकाला घेतलं ताब्यात …!

आपल्या देशातल्या प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये 'लाच घेणं आणि लाच देणं गुन्हा आहे', अशी स्टिकर्स...

पोलीस, एस. आर. पी. एफ. आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान अशी आहे तिहेरी ‘स्ट्राँग’ सुरक्षा ; कुठं? अहो, वाचा की मग सविस्तर…!

लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी नगर आणि शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर...

शिस्तबद्ध अशा पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची बारकाईनं काळजी घ्या : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना…!

आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. जगातला सर्वात शिस्तबद्ध असा हा पालखी...

कांद्याची निर्यात 35 टक्क्यांनी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्याच्या प्रश्नावर काहीच बोलत नाही, यावरुन मध्यंतरी मोठी नाराजी पसरली होती....