राजकारणअहिल्यादेवीनगरच्या मराठा मतदारांमध्ये मोठा राजकीय पेचप्रसंग ; कोणाला सत्तेची संधी द्यावी आणि...

अहिल्यादेवीनगरच्या मराठा मतदारांमध्ये मोठा राजकीय पेचप्रसंग ; कोणाला सत्तेची संधी द्यावी आणि कोणाला घरी बसवावं? दोघेही आहेत मराठा समाजाचे उमेदवार…!

spot_img

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत संभाव्य अहिल्यादेवीनगर (सध्याचं अहमदनगर) जिल्ह्यातल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभेच्या निवडणुकीत नक्की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला घरी बसवायचं, असा मोठा पेचप्रसंग या मतदारसंघातल्या मराठा मतदारांसमोर उभा ठाकला आहे. याचं कारण दोन्हीही संभाव्य उमेदवार मराठा समाजाचेच आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना पक्षाच्यावतीनं उमेदवारी दिली जाणार आहे, हे अगदी सूर्य प्रकाशाइतकं प्रखर सत्य आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे विद्यमान आमदार निलेश लंके यांनीसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत दंड थोपटले आहेत. त्यांची उमेदवारी प्रसार माध्यमांनी एव्हाना जाहीरदेखील करून टाकली आहे.

खासदार डॉक्टर विखे आणि लंके हे दोघेही मराठा समाजाचे आहेत. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात मोठा संघर्ष उभा राहिला असताना या दोघांची भूमिका मात्र गुलदस्त्यातच होती. आगामी लोकसभा निवडणुकीत या दोघांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातला मराठा मतदार कितपत स्विकारणार, हे पाहावं लागणार आहे. खासदार डॉक्टर विखे यांनी मध्यंतरी साखर वाटपाचा कार्यक्रम करत मतदारांनाच आपलंसं करण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या बाजूला खासदार डॉ. विखे यांना शह देण्यासाठी नगर – पारनेर मतदार संघाचे विद्यमान आमदार लंके यांनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी या महानाट्याचं नगरमध्ये आयोजन केलं. एकाचवेळी 60 हजार शिवप्रेमी हे महानाट्य पाहू शकतील, अशी व्यवस्था या महानाट्यात करण्यात आली. दिनांक एक ते चार मार्च या कालावधीमध्ये ही महानाट्य सुरू आहे. या महानाट्याला सध्या प्रचंड गर्दी होत आहे. किंबहुना या महानाट्याच्या माध्यमातून आमदार लंके यांनी विद्यमान खासदार डॉ. विखे यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदार संघात मोठी गंमतीशीर लढत पाहायला मिळणार आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...