गुन्हेगारीअबब! 25 लाखांचं गोमांस जप्त ; अहिल्यानगर एलसीबीची कारवाई...!

अबब! 25 लाखांचं गोमांस जप्त ; अहिल्यानगर एलसीबीची कारवाई…!

spot_img

राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमांस वाहतूक व विक्री करणा-या इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे.

नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी दि. 17/4/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव व अंमलदार भाऊसाहेब काळे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, सचिन अडबल, संतोष लोढे, संतोष खैरे, रविंद्र घुगांसे, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, रणजित जाधव, भाऊसाहेब काळे अशांना अहमदनगर शहर परिसरात पेट्रोलिंग करुन गोमांस वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन मिळून आल्यास कारवाई करण्याच्या सुचना देऊन पथकास रवाना केले.

हे पथक गोमांस वाहतूक व विक्री करणा-या इसमांची माहिती घेत असताना पथकास शोएब कुरेशी, फैजान कुरेशी, सुफियान कुरेशी (सर्व रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर) हे सरकारी शौचालया जवळ, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट अहमदनगर या ठिकाणी गोवंशी जनावरांची कत्तल करण्याची मनाई असताना गोवंशी जातीचे जिवंत जनावरांची कत्तल करुन गोमांस टेम्पोमध्ये भरतात व गोवंशी जातीची काही जीवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने जवळच असलेल्या शेडमध्ये गोवंशाची जनावरे डांबून ठेवलेली आहेत, अशी खात्रीशीर माहिती या पथकाला मिळाली.

त्यानुसार या पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी काही इसम 1 टेम्पोमध्ये गोमांस भरताना दिसले व एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीमध्ये जनावरे असल्याचे दिसले. पथकाने अचानक छापा घालून काही इसमांना जागीच पकडलं.

पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावं शोएब रौफ कुरेशी (वय 28), फैसल अस्लम शेख वय 19), अदनान फिरोज कुरेशी (वय 20) मुसाविर इन्नुस कुरेशी (वय 23) ओवेस रशिद शेख (वय 24) अल्तमश अस्लम कुरेशी (वय 22 सर्व रा. सरकारी शौचालया जवळ, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर) असे सांगितले.

सदर ठिकाणी असलेल्या शेडची पाहणी करता त्यामध्ये जीवंत गोवंशीय जनावरे विना चारा पाण्याचे निर्दयतेने डांबून ठेवल्याचं दिसून आल्यानं ताब्यातील इसमांना जनावरे व कत्तल केलेल्या गोमांस बाबत विचारपूस करता ताब्यातील इसमांनी फैजान इद्रिस कुरशी (फरार) व सुफियान ऊर्फ कल्लु इद्रिंस कुरेशी (फरार) (दोन्ही रा. सरकारी शौचालय जवळ, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर) यांनी जीवंत जनावरे खरेदी करुन ते कत्तल करण्यासाठी आणल्याचे सांगितले.

ताब्यातील 6 आरोपींच्या कब्जातून 7 लाख 98 हजार रुपये किंमतीचे 2 हजार 660 किलो वजनाचे गोमांस, 7 लाख 70 हजार रुपये किंमतीची 11 मोठी जीवंत जनावरे, 6 लाख रुपये किंमतीचा 1 पांढरे रंगाचा महिंद्रा पिकअप, 4 लाख रुपये किंमतीचा 1 अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व 400 रुपये किंमतीचे लोखंडी सुरी व सत्तुर असा एकुण 25 लाख 68 हजार 400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

हा सर्व मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द कोतवाली पोलास ठाण्यात गु.र.नं. 498/2024 भादंविक 269, 429, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (अ), (ब), (क), 9 व प्राण्यांना निर्दयतेने वागवीनेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...