एलजी बालकृष्णन अँड ब्राॅस लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा Return’s मिळवून दिलाय. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात जबरदस्त पटींनी वाढू शकतात. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी (दि. 16) बीएसई निर्देशांकांवर होते.
ही कंपनी दुचाकी वाहनांसाठी ड्राईव्ह चैन पुरविणारी कंपनी आहे. त्याचप्रमाणं ही कंपनी चार चाकी वाहनांचे उत्पादन करणार्या मोठ्या आॅटोमोबाईल कंपन्यानांदेखील आॅटो चैन पुरविते.
या कंपनीचा ग्राहक वर्ग अमेरिकेतही America विस्तारलेला आहे. ही कंपनी तिचे उत्पादन अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांना निर्यात करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2184 . 28 कोटी रुपये आहे.
एलजी बालकृष्णन अँड ब्राॅस लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 28 मार्च 2002 रोजी 3 . 94 रुपयांवर ट्रेड करत होते. 20 वर्षांनंतर हा स्टाॅक 176 पट वाढीसह 695 . 80 रुपयांवर ट्रेड करत आहे. अजूनही या स्टाॅकमध्ये अप ट्रेंड सुरु आहे.
जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 57 हजार रुपये लावले असते तर आणि गुंतवणूक होल्ड करुन ठेवली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मुल्य वाढून सध्या ते 1 कोटी रुपयांपर्यंत गेले असते.
आता या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवा, हा आम्ही म्हणजे ‘महासत्ता भारत’ टीम Team Mahasatta Bharat तुम्हाला कदापि आग्रह करणार नाही. यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घ्या. कारण शेअर बाजारात सतत अप अँड डाऊन Up & Daun सुरुच असतं.