Pune-Aurangabad Expressway: अशा पद्धतीचा असेल पुणे-औरंगाबाद महामार्गाचा प्रवास, ‘या’गावातून होणार जमिनीचे संपादन

spot_img

Pune-Aurangabad Expressway: अशा पद्धतीचा असेल पुणे-औरंगाबाद महामार्गाचा प्रवास, ‘या’गावातून होणार जमिनीचे संपादन

महाराष्ट्र मध्ये जे काही मोठमोठे महामार्गांचे काम सुरू आहे त्यातील एक महत्त्वाचा महामार्ग म्हणजे पुणे औरंगाबाद एक्सप्रेस वे हा होय. जर आपण या महामार्गाचा विचार केला तर हा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया एनएचएआय च्या माध्यमातून बांधला जाणार असून त्याची लांबी 225 किमी इतके आहे. हा महामार्ग औरंगाबाद, नगर आणि पुणे जिल्ह्याचे विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकणारा महामार्ग आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेच्या माध्यमातून या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे विकसित केला जाणार आहे. अद्याप पर्यंत या प्रकल्पाचा डीपीआर निश्चित झालेला नाही. या लेखांमध्ये आपण ह्या एक्सप्रेस वे च्या जमीन संपादन आणि कुठल्या जिल्ह्यातील कोणत्या गावातून हा महामार्ग जाणार आहे किंवा जमीन संपादित केली जाणार आहे? त्याबद्दल महत्वाची माहिती घेऊ.

कशा पद्धतीची आहे या महामार्गाचे स्वरूप?
पुणे औरंगाबाद एक्सप्रेस वे हा समृद्धी महामार्गाशी जोडला जाणारा असून या महामार्गामुळे औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही शहरातील प्रवासाचा वेळ हा जवळजवळ पाच तासांवरून दोन तासांपर्यंत कमी होणार आहे. या महामार्गासाठी अंदाजीत खर्च दहा हजार कोटी येणार असून याची लांबी 225 किलोमीटर आहे. हा सहा लेन महामार्ग असून याची रुंदी 70 मीटर इतकी असणार आहे.

सदयपरिस्थितीत त्यासाठीची आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जर या महामार्गाची सुरुवात पाहिली तर ती पुणे येथील रिंगरोड पासून होणार असून औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसी या ठिकाणी समृद्धी महामार्गाला हा कनेक्ट केला जाणार आहे. या महामार्गाला दोन ठिकाणी प्रवेशद्वार देण्यात आलेले आहेत त्यातील पहिले म्हणजे रांजणगाव आणि दुसरे म्हणजे बिडकीन हे होय.

दोनच ठिकाणी या महामार्गावर प्रवेश करता येणार असल्याचे बोलले जात आहे. महामार्ग औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मधील 17 आणि औरंगाबाद तालुक्यातील सातारा 24 गावातून जाणार असून त्यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जे काही रेखांकन केले आहेत त्या रेखांकनानुसारच जमिनीची मोजणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या जिल्ह्यातील या गावांमधून जाईल हा महामार्ग

1- औरंगाबाद तालुका– सुंदरवाडी, जलता, आडगाव बिके,चिंचोली, घरदोन, हिरापूर

2- पैठण तालुका– वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूवारी, वरुडीबीके, वावा, वडाळा, पाचलगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखातवाडा, वाघरी, दादेगाव जहांगीर, पाटेगाव, सायगाव, पैठणी एम.सी.

अहमदनगर जिल्हा

1- शेवगाव तालुका– खडके, मडके, चापडगाव, वरखेड, हसनापूर, मुरशतपूर, प्रभू वडगाव, सोमठाणे आणि डोंगर आखेगाव

2- श्रीगोंदा तालुका– हिंगणी दुमला, देव पैठण आणि वाकरेवाडी

3- पारनेर तालुका– पाडळी रांजणगाव, बाबुर्डी,कडूस, रुई छत्रपती, पिंपरी गवळी, रायतळे, सारोळा कासार आणि आष्टी गाव

4- नगर तालुका– उक्कडगाव, दगडवाडी, मराठवाडी, भातोडी पारगाव, दशमी गव्हाण आणि बाबुर्डी घुमट

5- पाथर्डी तालुका– प्रभू पिंपरी, सैदापूर, दागेवाडी, तिसगाव, निवडुंगे, देवराई आणि शिरापूर

पुणे जिल्हा

1- भोर तालुका– वरवे बुद्रुक, शिवरे, कासुर्डी क.भा., कासुर्डी गु. एम.एसस्सी., मौजे कांजळी

2- हवेली तालुका– तरडे, वळती, आळंदी महतोबाची, शिंदवणे, सोरतापवाडी, हिंगणगाव, भवरपुर आणि कोरेगाव मुल

3- पुरंदर तालुका– कोडीत खुर्द, वरवडी, थापेवाडी, गराडे, चांबळी, सासवड, पवारवाडी, हिवरे, दिवे, सोनोरी आणि काळेवाडी

4- दौंड तालुका– मिरवाडी

5- शिरूर तालुका– गोळेगाव, चव्हाणवाडी, देवकरवाडी, पिलनवाडी, पाटेठाण,तेलवारी, वडगाव बांडे, राहू, टाकळी व पानवली, उरळगाव, सातकरवाडी, दहिवडी, आंबडे, कोरडे, बाबूळसर खुर्द, रांजणगाव गणपती आणि कारेगाव

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :