युवा विश्वNeet परिक्षेत गैरप्रकार झाला असल्यास मान्य करा : सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार...

Neet परिक्षेत गैरप्रकार झाला असल्यास मान्य करा : सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि एन. टी. ए. ला सुनावलं…!

spot_img

Neet या परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी खूप मनापासून तयारी केली आहे. त्यांची मेहनत आम्ही विसरु शकत नाही. या परीक्षेत तुमची चूक आहे की इतरांची हे मान्य करा. चूक झाली असल्यास संबंधितांवर कारवाई करु, असं म्हणा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी यांनी केंद्र सरकार आणि एन. टी. ए. ला सुनावलंय. या खटल्याची पुढील सुनावणी दि. ८ जुलै रोजी होणार आहे.

दरम्यान, याचिकाकर्ते नितीन विजय यांच्या वकिलांनी बिहार आणि गुजरात पोलिसांसह विभागीय चौकशीचा स्टेटस रिपोर्ट्स हवा असल्याचं कोर्टाला सांगितलं. त्यावर न्यायमूर्ती नाथ म्हणाले की ‘तुम्ही आठ जुलैला न्यायालयासमोर युक्तिवाद करा’.

वकिलांशी चर्चा करताना न्यायमूर्ती भट्टी म्हणाले, ‘व्यवस्थित असलेल्या उणिवांचा लाभ घेत एखादा डॉक्टर झाला आणि तुमच्यावर तो उपचार करु लागला तर असा डॉक्टर तुमच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी धोकादायक ठरणारा आहे’.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...