लेटेस्ट न्यूज़Nashik Truck Accident : देवदर्शनाहून परतणाऱ्या पिक-अपला ट्रकची धडक, नाशिकमध्ये ८ जण...

Nashik Truck Accident : देवदर्शनाहून परतणाऱ्या पिक-अपला ट्रकची धडक, नाशिकमध्ये ८ जण जागीच ठार, जखमींमध्ये…

spot_img

Nashik Truck Accident : देवदर्शनाहून परतणाऱ्या पिक-अपला ट्रकची धडक, नाशिकमध्ये ८ जण जागीच ठार, जखमींमध्ये…

नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर एक भीषण अपघात झाला आहे. एका पिक-अप आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात झाला असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर एक भीषण अपघात झाला आहे. एका पिक-अप आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात झाला असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिक-अपची लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या टेम्पोशी धडक झाल्यानं या अपघातात अजूनही काही जण जखमी आहेत.

अपघातातील सर्व जखमी आणि मृत हे कामगार असल्याचं सांगण्यात येतंय. हे सर्व कामगार नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी आहेत. निफाडमधील धार्मिक स्थळावरून परतत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. अपघातातील जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नाशिकचे सिव्हिल सर्जन यांनी दिलेल्या म्हणण्यानुसार, त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले लोकांपैकी पाच जण मृत असल्याचं कळलं. तर 5 जखमींवर उपचार सुरू आहेत. 2 जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सिव्हिल सर्जन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून, अतुल मंडलिक,संतोष मंडलिक, दर्शन घरत, यश घरत आणि चेतन पवार यांचा मृत्यू झालाय.तर राहुल राठोड, लोकेश निकम, अरमान खान आणि इतर तिघे जखमी झाले आहेत.

या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर येथील रहिवासी आहेत. ते पिक-अपमधून देवदर्शनासाठी गेले होते. नाशिकला परतत असताना, द्वारका चौकातील उड्डाणपुलावरून खाली उतरताना पिकअपच्या लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...