नगर तालूका उपनिबंधक रत्नाळे साहेब! एका महिलेला दोन महिन्यांपासून तुमच्याकडून न्याय का मिळत नाही? सहकारातल्या ‘भस्मासुरां’ना तुम्ही पाठीशी घालताय का?

spot_img

नगर तालूका उपनिबंधक रत्नाळे साहेब!   एका महिलेला दोन महिन्यांपासून तुमच्याकडून न्याय का मिळत नाही?   सहकारातल्या ‘भस्मासुरां’ना तुम्ही पाठीशी घालताय का?

राज्याच्या सहकार चळवळीला मजबूत करण्याच्या साठी नगर जिल्ह्यातल्या सहकार चळवळीनं खूप मोठा हातभार लावलाय. नगर जिल्ह्याच्या सहकार चळवळीला मोठा इतिहास आहे. मात्र असं असताना या सहकार चळवळीत अलीकडच्या काळात अनेक भस्मासूर जन्माला आहेत. या ‘भस्मासुरां’नी सहकार चळवळ मोडीत काढलीय.

दुर्दैवाची बाब ही आहे, की नगर जिल्ह्यातल्या सहकार चळवळीला मोडीत काढणार्‍या या भस्मासुरांना तालूका उपनिबंधक कार्यालय पाठीशी घालतंय की काय, अशी शंका यानिमित्तानं उपस्थित केली जात आहे. ही शंका उपस्थित होण्यामागं कारणंही तितकंच महत्वाचं आहे.

नगर तालुक्यातल्या वाळकी गावच्या सौ.मोनाली बोठे आणि अरुण बोठे या बोठे दाम्पत्यानं दोन महिन्यांपूर्वी नगरच्या तालूका उपनिबंधक कार्यालयात रत्नाळे यांना एक निवेदन दिलंय. बोठे दाम्पत्यानं या निवेदनाद्वारे रेशनिंगचा लाखो रुपयांचा घोटाळा उघडकीला आणून देण्याचा प्रयत्न केलाय.

नगर तालुक्यातल्या 54 सेवा सोसायट्यांना शासनाकडून धान्य वाटपाचं जे कमिशन दिलं जातं, ते कमिशन या 54 सेवा सोसायट्यांच्या चेअरमन आणि संचालक मंडळाच्या बँक खात्यात जमा न करता सेल्समनच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचा आरोप बोठे दाम्पत्यानं या निवेदनाद्वारे केलाय.

राज्याचे मुख्यंमंत्री, सहकार मंत्री, लोकायुक्त, अँटी करप्शन ब्युरो, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आदींना बोठे यांनी या निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत. बोठे यांनी या निवेदनात म्हटलंय, की नगर तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी या 54 सेवा सोसायट्यांच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्याकडून ‘आम्हाला शासनाचं कमिशन नको’, असे सेवा सोसायट्यांच्या प्रोसिडिंगशिवाय खोटे ठराव करुन घेतले.

नगर तालुक्याचे तहसीलदार पाटील यांनी नियम धाब्यावर ठेऊन हा ‘उद्योग’ केल्याचा गंभीर आरोप बोठे यांनी या निवेदनाद्वारे केलाय. बोठे यांच्या म्हणण्यानुसार नगर जिल्हा पुरवठा अधिकारी, नगर तालुक्याचे तहसीलदार आणि अन्य लोकांच्या संगनमतानं हा भ्रष्टाचार करण्यात आलाय. त्यामुळे नगर तालूका उपनिबंधक रत्नाळे यांनी तहसीलदार पाटील यांच्याकडून याबाबत अहवाल मागवावा, त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी. अशी मागणीही केली आहे.

विशेष बाब ही आहे की, बोठे यांनी दोन महिन्यांपूर्वी नगर तालूका उपनिबंधक रत्नाळे यांना दिलेल्या या निवेदनाचा उपनिबंधक रत्नाळे कुठलाच विचार केला नाही. एका अर्थानं रत्नाळे यांनी संबंधितांना पाठीशी घातलं आहे.

या यार्श्वभूमीवर बोठे आणि तमाम रेशनकार्ड धारकांच्यावतीनं ‘महासत्ता भारत’ टीम तालूका उपनिबंधक रत्नाळे यांना विचारु इच्छिते, की ‘उपनिबंधक रत्नाळे साहेब, एका महिलेला दोन महिन्यांपासून तुमच्याकडून न्याय का मिळत नाही ? सहकारातल्या ‘भस्मासुरां’ना तुम्ही का पाठीशी घालताय ?

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :