गुन्हेगारीIPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा...

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

spot_img

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

नवटाकेंविरोधात फसवणूक व गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआय १,२०० कोटींच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करत आहे.

जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी सुनील झंवर, तसेच कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे दिलेल्या तक्रार अर्जावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला आहे. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी सीबीआयने नवटाकेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवटाके यांनी यांनी १,२०० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाचं नेतृत्त्व केलं होतं. यात त्यांनी उचित कारवाई केली नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी यामध्ये आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माळशिरस नगरपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..!

माळशिरस नगरपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..! माळशिरस: - माळशिरस नगरपंचायतीचे कर निर्धारण अधिकारी विकास गोरख पवार...

दौलत (नाना ) शितोळे ना राज्यमंत्री दर्जा तर भाऊसाहेब शिंदे ना विधान परिषद मिळणारं

दौलत (नाना ) शितोळे ना राज्यमंत्री दर्जा तर भाऊसाहेब शिंदे ना विधान परिषद मिळणारं मुंबई...

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक नेमावं: वडारवाडी ग्रामपंचायतीची मागणी…!

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी पोलीस पथक नेमावं: वडारवाडी ग्रामपंचायतीची मागणी...! अहिल्यानगरजवळ असलेल्या भिंगारलगतच्या वडारवाडी ग्रामपंचायत...

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात कंत्राटी कामगारांचाच बोलबाला…! एसीबी ने लक्ष देण्याची आवश्यकता..,

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात कंत्राटी कामगारांचाच बोलबाला...! एसीबी ने लक्ष देण्याची आवश्यकता.., एखाद्या कंत्राटी कामगाराला...