‘ही’ तर भारतीय सैन्याची रोजची कसरत ! पण चीनला बसला जबरदस्त हादरा !

spot_img

चीनच्या सीमेवर भारतीय सैन्यानं आज (दि. 18) रोजची कसरत Daily Rutin Practice केली. पण ही कसरत इतकी धमाकेदार होती, की त्यामुळे शत्रू राष्ट्र असलेल्या चीनला जबरदस्त हादरा बसला. भारतीय लष्कराची उडणार्‍या विमानांच्या आवाजांनी चीनचं लष्कर ‘टेन्शन’मध्ये आलं.

चीन हा भारताचा कधी उघड तर कधी छुपा शत्रू राहिला आहे. अतिशय स्वस्तातल्या वस्तू जगाच्या बाजारपेठेत विकायच्या. भारतीय बाजारपेठेतही चीनच्या स्वस्त वस्तू उपलब्ध आहेत. पण या वस्तूंची कुठलीही वारंटी किंवा गॅरंटी Waranty OR Garanty नसते.

चीनच्या वस्तूंबद्दल गंमतीनं असंही बोललं जातं, ‘चले तो चाँद तक नहीं तो शाम तक’! या वस्तुंमध्ये सायकलला हवा भरण्याचा पंप,बॅटरीज्, मोबाईल, पाॅवर बँक, चायना मांजा, चायना लाईट्स माळ, चायनाचे फटाके, चायनिज खाद्यपदार्थ आदींचा समावेश होतो.

या चीनी वस्तू भारतीय बाजारपेठेत स्वस्तात मिळत असल्या तरी त्या वस्तू विकत घेऊन तुम्ही आम्ही खर्‍या अर्थानं आपल्या देशाशी गद्दारी करतो आहोत. हे गुह्य ज्ञान ज्यांना माहित नाही, ते या वस्तू सर्रासपणे विकत घेतात.

या चीनी वस्तूंच्या विक्रीतून तुमचे आमचे लाखो रुपये चीनला जातात. बरं यातून चीनची अर्थव्यवस्था बळकट तर होतेच. पण हा पैसा चीनचं सरकार पाकिस्तानकडून भारताविरुध्द शस्त्रास्त्र खरेदी करण्यात खर्च करतं.

आजच्या भारतीय लष्कराच्या उग्र आणि भयंकर कसरतींनी चीनचं सैन्य प्रचंड भेदरलंय. भारतीय सैन्य दलातल्या रक्षा विशेषज्ञांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भारतीय सैन्याच्या या करतींविषयी सविस्तरपणे चर्चा केली.

या अधिकार्‍यांनी सांगितलं, की भारतीय सैन्य दलाच्या जवानांची ही रोजचीच कसरत होती. पण रोजच्या पेक्षा आजची कसरत नेहमीपेक्षा आक्रमक होती. दरम्यान, भविष्यात भारताचं चीनबरोबर युध्द होईल का आणि या संभाव्य युध्दासाठी भारतीय सैन्य दलाची तयारी आहे का, असा प्रश्न रक्षा विशेषज्ञांना विचारण्यात आला.

या प्रश्नाचं उत्तर देतांना या अधिकार्‍यांनी सांगितलं, की भारतीय सैन्य दल संभाव्य युध्दासाठी सतत तयार आहे आणि ही तयारी का नसायला हवी ? चीन अशी आगळीक करणार नाही. पण भविष्यात चीनकडून अशी चूक झालीच तर भारतीय सैन्य याचं उत्तर ‘जशास तसं’ अशा पध्दतीनं देईल’.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :